IPL च्या वेळापत्रकात मोठा बदल! आता 'या' ठिकाणी रंगणार फायनलचा थरार, Play Off चे सामने कुठे होणार?

मुंबई तक

IPL 2025 New Schedule : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या फायनलच्या सामन्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

ADVERTISEMENT

IPL 2025 New Schedule
IPL 2025 New Schedule
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आयपीएल 2025 च्या फायनलचं ठिकाण बदललं

point

आयपीएलचं नवं शेड्यूल कसं आहे?

point

प्ले ऑफच्या सामन्यांचेही वेन्यू बदलले

IPL 2025 New Schedule : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या फायनलच्या सामन्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएल फायनलच्या ताज्या शेड्यूलनुसार, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये फायनलचा सामना 3 जूनला रंगणार आहे. मंगळवारी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (बीसीसीआय) हा निर्णय घेतला आहे. तसच अहमदाबादच्या या मैदानात 1 जूनला क्लालिफायर सामनाही खेळवला जाणार आहे.

कसं आहे आयपीएल 2025 नवं शेड्यूल?

दरम्यान, प्ले ऑफचे पहिले दोन सामने म्हणजेच क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर - अनुक्रमे 29 मे आणि 30 मे रोजी मुल्लांपूर, नवीन चंदीगढमध्ये खेळवले जाऊ शकतात. या ठिकाणांची निवड करताना बीसीसीआयने हवामानाचा अंदाज पाहिला. कारण देशात पावसाचं आगमन झालं असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे.

हे ही वाचा >> ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा! 'त्या' ठिकाणी चारवेळा केली रेकी, प्रसिद्ध मंदिराची सुरक्षा वाढवली

पहिल्या शेड्युलनुसार, आयपीएल 2025 चा फायनलचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये होणार होता. पण आता यात बदल करण्यात आला आहे.भारत-पाकिस्तान यांच्यात सुरु झालेल्या तणावामुळे बीसीसीआयने आयपीएल 2025 चे सामने एका आठवड्यासाठी स्थगित केले होते. त्यानंतर 17 मे पासून पुन्हा आयपीएलचे सामने सुरु झाले. यामुळे बीसीसीआयला आयपीएलच्या शेड्युलमध्ये बदल करावा लागला. फायनलचा सामना आता 25 मे च्या ऐवजी 3 जूनला खेळवला जाणार आहे.

दक्षिण भारतातील पतिकूल हवामानामुळे आयपीएलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरोधात होणारा सामना लखनऊला शिफ्ट केला आहे. हा सामना शुक्रवारी 23 मे रोजी बंगळुरुत खेळवण्यात येणार होता. आरसीबी आता सनरायजर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्सविरोधात लीग सामने अनुक्रमे 23 आणि 27 मे रोजी इकाना स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. 

हे ही वाचा >> 'मी लवकरच येईल..Love You कुश मुश', ज्योती मल्होत्राने टाकला 'लेटरबॉम्ब', पोलिसांना सापडली खतरनाक डायरी

हे वाचलं का?

    follow whatsapp