Ola च्या इंजिनिअरने आयुष्य संपवलं, कामाचं टेन्शन वाढलं अन्...

मुंबई तक

Ola Employee Viral News : एका सोशल मीडिया पोस्टने दावा केला आहे की, ओला क्रूट्रिमचा एक कर्मचारी निखिल सोमवंशीने टॉक्सिक वर्क कल्चर आणि वाढत्या कामाच्या दबावामुळे स्वत:चं जीवन संपवलं आहे.

ADVERTISEMENT

Ola Company Employee Ends Life
Ola Company Employee Ends Life
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ओला कर्मचाऱ्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

point

बॉसच्या चुकीच्या वागणुकीमुळे जीवन संपवलं

point

त्या कर्मचाऱ्यासोबत नेमकं घडलं तरी काय?

Ola Employee Viral News : ओला कंपनीची (OLA) आर्टिफिशियल इंटेलिजेंस इकाई क्रुट्रिम (Ola krutrim) खूप चर्चेत आहे. एका सोशल मीडिया पोस्टने दावा केला आहे की, ओला क्रूट्रिमचा एक कर्मचारी निखिल सोमवंशीने टॉक्सिक वर्क कल्चर आणि वाढत्या कामाच्या दबावामुळे स्वत:चं जीवन संपवलं आहे. या घटनेनंतर ओलाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जोरदार टीका केली जात आहे. ओलाच्या एका कर्मचाऱ्याने सोशल मीडिया पोस्टवर दावा केला आहे की, त्याच्यासोबत काम करणारा त्याचा मित्र निखिल समोवंशीने टॉक्सिक वर्क कल्चर आणि अतिरिक्त कामाच्या प्रेशरमुळे स्वत:चं आयुष्य संपवलं. 

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, 8 मे रोजी बंगळुरुच्या अगरा झीलमध्ये निखिल सोमवंशीचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेसंबंधित एक रेडिट पोस्ट खूप व्हायरल झाली आहे. यामध्ये ओला कंपनीच्या जीवन संपवलेल्या इंजिनिअरबाबत म्हटलंय की, मला माहित नाही की हे आतापर्यंत सार्वजनिक मुद्दा का नाहीय.

हे ही वाचा >> Mumbai COVID-19 Death: मुंबईत पुन्हा कोरोना आला.. दोघांचा मृत्यू? खरं काय ते समजून घ्या!

माझ्या एका सहकारी कर्मचाऱ्याने कामाच्या तणावामुळे स्वत:चं जीवन संपवलं आहे. तो ओला क्रूट्रिम टीमध्ये काम करत होता आणि दोन अन्य लोकांसोबत एका प्रोजेक्टला लीड करत होता. इतर दोघांनी कंपनी सोडली होती. म्हणून तो त्यांच्या कामाविषयी नाराज होता. मी नाव नाही घेतलं पाहिजे, पण मॅनेजर राज किरणला अजिबात माहित नाही की, लोकांना कसं मॅनेज केलं जातं.

हे वाचलं का?

    follow whatsapp