महिलेनं तब्बल 25 तरुणांशी केलं लग्न; नंतर पैसे घेऊन व्हायची फरार, बाईईई काय हा प्रकार...
Crime News : राजस्थानातील सेवईमध्ये लग्नाच्या नावाखाली तरुणांना 25 वेळा फसवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली. तिने एक दोन नाहीतर तब्बल 25 जणांशी विवाह केला आहे. यामुळे याला विवाह म्हणायचा की बिजनेस? असा प्रश्न निर्माण होत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राजस्थानातील सेवईमध्ये लग्नाच्या नावाखाली तरुणांना 25 वेळा फसवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली.
आरोपी महिलेचे नाव अनुराधा असल्याचे सांगण्यात येत आहे.
अनुराधाला पोलिसांनी भोपाळ येथून अटक केली आहे.
Crime News : राजस्थानातील सेवईमध्ये लग्नाच्या नावाखाली तरुणांना 25 वेळा फसवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली. आरोपी महिलेचे नाव अनुराधा असल्याचे सांगण्यात येत आहे. लग्नाच्या काही दिवसानंतर अनुराधाला पोलिसांनी भोपाळ येथून अटक केली आहे. अनुराधा ही दरवेळी दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन घेऊन पळून जात असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी पोलीस अनुराधाची चौकशी करत आहेत. या मागे एक टोळी काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : प्रोटोकॉल, अंडरकव्हर एजंटसारखे शब्द... ज्योती मल्होत्राच्या चॅटमधून मोठा गौप्यस्फोट?
मॅनटाउन पोलीस ठाण्याचे एएसआय मीठा लाल यादव यांनी सांगितले की, विष्णू शर्मा नावाच्या तरुणाने 3 मे रोजी सवाई माधोपूरच्या मॅनटाउन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यात एका दलाल आणि एका महिलेने लग्नाच्या नावाखाली त्यांच्याकडून दोन लाख रुपये उकळले आहेत. कोर्ट मॅरेज केल्यानंतर काही दिवसांमध्ये अनुराधा घरात असलेल्या सर्व वस्तू आणि सामान घेऊन पळून गेली आहे. तपासादरम्यान असे दिसून आले की, महिलेने 25 तरुणांशी लग्न करून त्यांची फसवणूक केली आहे.
कोण आहे अनुराधा?
अनुराधा ही विशाल पासवनाची पत्नी आहे. ती मूळची उत्तर प्रदेशमधील महाराजगंज येथील रहिवासी आहे. सध्या अनुराधा ही भोपाळ येथील शिवनगर येथे वास्तव्यास आहे. अनुराधाने तब्बल 25 तरुणांसोबत विवाह केले आहेत. ज्यात ती विवाहानंतर घरातील सर्व वस्तू घेऊन पळून जायची. तसेच सोबत असणारे पैसे घेऊनही ती फरार व्हायची. त्यानंतर ती पुन्ही दुसऱ्या तरुणासोबत विवाह करायची. तिने एक दोन नाही तर तब्बल 25 वेळा असंच केलं.










