कोकणात मेघगर्जना, विजांचा कडकडाट अन् सोसाट्याचा वारा..तर मुंबईत पाऊस घालणार धुमाकूळ? जाणून घ्या आजचं हवामान
Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह, विजांचा कडकडाट आणि पावसाच्या सरी कोसळत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात कोणत्या जिल्ह्यात पसरणार उष्णतेच्या लाटा?
या जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या हलक्या सरी
आजच्या हवामानाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह, विजांचा कडकडाट आणि पावसाच्या सरी कोसळत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, मुंबई, रायगडसह पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. अशातच आज 21 मे 2025 रोजी हवामानाची स्थिती काय असणार आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती..
कोकण (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग)
पाऊस: कोकणात 20 आणि 21 मे रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 40-50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
तापमान: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कमाल तापमान 34 डिग्री सेल्सियस आणि किमान तापमान 26 डिग्री सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
वातावरण: ढगाळ आकाशासह काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने पावसाची तीव्रता वाढू शकते.










