Indian Air Force मध्ये मोठी भरती, 10वी-12वी पास तरूणांसाठी, संधी.. अर्जाची शेवटची तारीख कोणती?
भारतीय वायुसेनेने 'गट क' मधील सिव्हिलियन पदांसाठी भरती जाहीर केली आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क, हिंदी टायपिस्ट, कुक, स्टोअर कीपर, सुतार आणि एमटीएस सारख्या बऱ्याच पदांसाठी या भरती घोषित करण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारतीय हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी
10 वी आणि 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी भरती
हवाई दलात नोकरी मिळवण्यासाठी काय आहे प्रक्रिया?
Indian Air Force Recruitment 2025: अनेकांचं भारतीय हवाई दलात नोकरी मिळवण्याचं स्वप्न असतं. नुकतंच, भारतीय हवाई दलाने 'गट क' मधील सिव्हिलियन पदांसाठी भरती जाहीर केली आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क, हिंदी टायपिस्ट, कुक, स्टोअर कीपर, सुतार आणि एमटीएस सारख्या बऱ्याच पदांसाठी या भरती घोषित करण्यात आल्या आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांना ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइन अर्ज करावा लागेल. फॉर्म पाठवण्याची शेवटची तारीख 15 जून 2025 असून यानंतर कोणतेही अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
IAF Group C: पदाचे डिटेल्स
भारतीय हवाई दलाने सिव्हिलियन पदांसाठी ही थेट भरती जाहीर केली आहे. कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत? हे तुम्ही पाहू शकता.
याव्यतिरिक्त, तेजपूर आसाम येथील एअर ऑफिसर कमांडिंग एअर फोर्स स्टेशनसाठी लोअर डिव्हिजन क्लर्कच्या 1 पदासाठी, वेस्टर्न एअर कमांड (IAF) मध्ये हिंदी टायपिस्टच्या 1 पदासाठी, एअर फोर्स सेंट्रल अकाउंट्स ऑफिस (AFCAO), IAF मध्ये लोअर डिव्हिजन क्लर्कच्या 3 पदांसाठी रिक्त जागा आहेत.
MTS, LDC Clerk: पात्रता
या आयएएफ सरकारी नोकरीच्या पदांसाठी वेगवेगळ्या पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. एलडीसी क्लर्क पदासाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांना प्रति मिनिट 30 शब्द हिंदी आणि प्रति मिनिट 35 शब्द इंग्रजी टायपिंग असणं अनिवार्य आहे.










