Heavy rains in Maharashtra: साताऱ्यात पावसाने केला कहर, ही दृश्य पाहूनच भरेल धडकी! कोकणात तर...

मुंबई तक

IMD Alert in Maharashtra: साताऱ्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील अनेक तासांपासून साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कोसळत आहे.

ADVERTISEMENT

Heavy rains in Maharashtra
Heavy rains in Maharashtra
Google CTA

सातारा: पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील उंब्रज-भोसलेवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसभर पावासाच्या जोरदार सरी बरसत असल्याने महामार्गावर पाणी साचले आहे. तर संपूर्ण रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे.

महामार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहनधारकांना अत्यंत धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत असल्याचं दिसून आलं. पाण्याखाली रस्ता दिसत नसल्याने अनेक वाहनचालक अडचणीत सापडले असून अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

दरम्यान, स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी लक्ष घालून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.

हे ही वाचा>> आरारारारा खतरनाक! सरकारी कार्यालयात पॉर्न व्हिडीओ शूट करायचा, पती डॉक्टरला बायकोनं पाहिलं अन् घडलं...

पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून साताऱ्यासह संपूर्ण प. महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक भागात या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या मुसळधार पावसामुळे सातारा शहरासह परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांना देखील या पावसाचा मोठा फटका बसला आहे.