नाशिक: पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या, ‘या’ कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

ADVERTISEMENT

नाशिकमध्ये एका विवाहित जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन या दोघांनीही आपलं आयुष्य संपलं आहे. आर्थिक विवंचनेला कंटाळून या दोघांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

इंदिरा नगर भागात घडली धक्कादायक घटना

नोकरी गेल्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचना आणि वाढत्या कर्जामुळे आलेल्या नैराश्‍यातून अवघ्या दोन वर्षांपूर्वी विवाह झालेल्या जोडप्याने एकत्र गळफास घेत आत्महत्त्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पाथर्डी फाटा परिसरातील अनमोल नयनतारा गोल्ड सोसायटीमध्ये सदरची घटना घडली असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे

हे वाचलं का?

गौरव जितेंद्र जगताप (वय- 29) नेहा गौरव जगताप (वय-23) दोघे रा. अनमोल नयनतारा गोल्ड,इंदिरानगर असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी गौरवचा विवाह नेहा यांच्याशी थाटामाटात झाला होता. गौरव हे सातपूर येथील पेडीलाईट कंपनीत नोकरीला होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच गौरवची नोकरी गेली होती. त्यामुळे तो तणावात होता. नोकरी नसल्याने आर्थिक विवंचना निर्माण होऊन कर्ज वाढल्याचे समजते.

आर्थिक विवंचना आणि कर्ज वाढल्यानेच टोकाचं पाऊल

आर्थिक विवंचना आणि कर्ज वाढल्यानेच दोघांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला असावा, असे प्राथमिक चौकशीतून समोर येत असल्याचे इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांबळे यांनी सांगितले. याबाबत इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. मयत गौरव आणि नेहा यांच्या पार्थिवांवर सोमवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मयत गौरवचे वडील हे जिल्हा शासकीय रुग्णालयांतर्गत आरोग्य सेवेत कार्यरत आहेत.

ADVERTISEMENT

त्या दिवशी नक्की काय घडलं…

१८ डिसेंबरला रविवारी सायंकाळी नेहाला तिच्या मावशीने फोन केला होता. मात्र तिने फोन उचलला नाही, म्हणून त्यांनी गौरवचा भाऊ यश जगताप यास फोन करुन गौरव आणि नेहा फोन उचलत नसल्याचे सांगितले. सिडकोतील महाराणा प्रताप चौकात राहणाऱ्या यश हा भाऊ गौरव आणि नेहा यांना बघण्यासाठी अनमोल नयनतारा गोल्ड सोसायटीतील त्यांच्या घरी पोहोचला. घराचा दरवाजा बंद होता.

ADVERTISEMENT

त्यांनी दरवाजा वाजवला, आवाज दिला मात्र, आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे यश आणि त्याचे काका अरुण गवळी यांनी सोसायटीतील नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा गौरव आणि नेहा या दोघांनी हॉलमधील सिलिंग हुकाला सुताच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलं. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT