बॉयफ्रेंडच्या बर्थडेवर रोमँटिक होत सुजैन खानने केली पोस्ट; एक्स पत्नीच्या पोस्टवर हृतिकने केली ही कमेंट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खान सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. सुजैनचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीचा वाढदिवस आहे आहे. सुजैनने तिच्या बॉयफ्रेंडवर त्याच्या वाढदिवशी खूप रोमँटिक पोस्ट केली आहे. सुजैनने अर्सलानसाठी केलेल्या पोस्टवर हृतिक रोशननेही कमेंट केली आहे. सुजैन खानने तिचा प्रियकर अर्सलान गोनीच्या वाढदिवसानिमित्त एक प्रेमळ पोस्ट शेअर केली आहे. अर्सलानचा वाढदिवस खास बनवण्यासाठी सुजैनने तिचा आणि तिच्या रोमँटिक फोटोंचा व्हिडिओ शेअर केला आहे. अर्सलानसोबतच्या तिच्या रोमँटिक आयुष्याची झलक सुजैनच्या पोस्टमध्ये पाहायला मिळते. दोघांची केमिस्ट्री अफलातून आहे.

ADVERTISEMENT

सुजैननं केली रोमँटिक पोस्ट शेअर

अर्सलानसाठी रोमँटिक पोस्ट शेअर करताना सुजैनने कॅप्शनमध्ये तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिले आहे की, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय… तू माझ्यासाठी सर्वात अविश्वसनीय व्यक्ती आहेस. मी जे काही करते त्यात तुला मला सर्वोत्तम व्यक्ती बनवायचे आहे. माझ्या प्रेमाची व्याख्या तूच आहेस. सुझानच्या पोस्टवर, अर्सलाननेही त्याच्या लेडी लव्हवर प्रेमाचा वर्षाव केला आणि लिहिले, थँक्यू माय डिअर लव्ह.

…आणि हृतिकनं केली पोस्टवर कमेंट

सुजैनच्या प्रेमळ पोस्टवर अनेक सेलिब्रिटी अर्सलानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. संजय कपूर, सोनाली बेंद्रे, महीप कपूर, नीलम कोठारी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आणि चाहते अर्सलनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सुजैनचा माजी पती आणि बॉलिवूडचा हँडसम हंक कलाकार हृतिक रोशन आणि सबा आझाद यांनीही सुझैनच्या पोस्टवर कमेंट करून अर्सलानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हे वाचलं का?

घटस्फोटानंतर सुजैन खान आणि हृतिक रोशन आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. सुजैन अर्सलान गोनीला डेट करत असताना, हृतिक रोशन सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. चौघेही अनेकदा एकमेकांसोबत पार्टी करताना दिसतात. सुजैनबद्दल बोलायचे झाले तर तिचे अर्सलानवरचे प्रेम सर्वश्रुत आहे. सुजैन आणि अर्सलान अनेकदा व्हेकेशन एन्जॉय करताना दिसतात. दोघेही उघडपणे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करतात. तेव्हापासून सुजैन आणि अर्सलान यांनी त्यांचे नाते अधिकृत केले आहे. चाहते दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता हे जोडपे विवाह बंधनात कधी अडकतात, हे पाहावं लागल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT