Tauktae Cyclone- अमरावती आणि यवतमाळला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपलं
अमरावती शहरात अचानक वादळी सुसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर झाडांची पडझड झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसराजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या कार आणि दुचाकीवर झाड पडल्याने नुकसान झालं आहे. शहरातील बियाणी चौक तसंच विद्यापीठ परिसरात वादळी वाऱ्याचे झाडे उन्मळून पडली आहे. अनेक मोठी झाडं उन्मळून पडली त्यामुळे शहरातील काही भागातील वीज पुरवठा तासाभरापासून खंडित […]
ADVERTISEMENT
अमरावती शहरात अचानक वादळी सुसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर झाडांची पडझड झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसराजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या कार आणि दुचाकीवर झाड पडल्याने नुकसान झालं आहे. शहरातील बियाणी चौक तसंच विद्यापीठ परिसरात वादळी वाऱ्याचे झाडे उन्मळून पडली आहे. अनेक मोठी झाडं उन्मळून पडली त्यामुळे शहरातील काही भागातील वीज पुरवठा तासाभरापासून खंडित झाला आहे.
ADVERTISEMENT
तर दुसरीकडे नागपूर वेधशाळेने वर्तवलेला पावसाचा अंदाज आज खरा ठरला. यवतमाळ जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपून काढलंय. यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील आर्णी, दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यात आज संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास तुफान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. जोरदार वादळी वाऱ्याने अनेक झाडे कोसळून पडली. विद्युत तार तुटल्यामुळे काही गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. पंधरा ते वीस मिनिटं जोरदार पाऊस झाला.
हे वाचलं का?
दरम्यान तौकताई वादळ हे 17 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुंबईच्या (Mumbai) आसपास पोहचणार आहे. त्यामुळे मुंबई आणि इतरच्या परिसरात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मात्र, या वादळाचा मुंबई आणि जवळच्या परिसराला फारसा फटका बसत नसल्याचं सध्या तरी दिसतं आहे. मुंबईची रचना ही खोबणीत आहे. त्यामुळे सहसा वादळ हे मुंबईवर धडकत नसल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. मात्र असं असलं तरीही प्रशासन या वादळाला तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे. सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या दरम्यान तौकताई हे वादळ मुंबईहून पुढे सरकणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT