तौकताई Cyclone : NDRF चं पथक पुण्याहून गोव्यात दाखल, विविध राज्यांमध्येही पथकं तैनात
TaukTai चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर NDRF चं पथक गोव्यात दाखल झालं आहे. यामध्ये पुण्यातल्या एका पथकाचाही समावेश आहे. काही वेळापूर्वीच हे पथक गोव्यात दाखल झालं आहे. तर इतर पथकं हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारीच आली आहेत. एवढंच नाही तर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ या राज्यांमध्येही आवश्यक ती सगळी खबरदारी घेण्यात आली आहे. तसंच या ठिकाणीही NDRF च्या टीम […]
ADVERTISEMENT
TaukTai चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर NDRF चं पथक गोव्यात दाखल झालं आहे. यामध्ये पुण्यातल्या एका पथकाचाही समावेश आहे. काही वेळापूर्वीच हे पथक गोव्यात दाखल झालं आहे. तर इतर पथकं हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारीच आली आहेत. एवढंच नाही तर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ या राज्यांमध्येही आवश्यक ती सगळी खबरदारी घेण्यात आली आहे. तसंच या ठिकाणीही NDRF च्या टीम दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफचे डीजी एस. एन. प्रसाद यांनी ही माहिती दिली.
ADVERTISEMENT
पुणे वेधशाळेचे SID विभागाचे प्रमुख केस एस. होसाळीकर यांनी काय म्हटलं आहे?
Tautkae या चक्रीवादळावर गोव्यातून लक्ष ठेवलं जातं आहे. रडारद्वारे या वादळाची तीव्रता किती आहे याचं मापन केलं जातं आहे. दक्षिण गोव्याच्या किनाऱ्यापासून हे वादळ साधारण 350 किमी लांब आहे असाही अंदाज त्यांनी IMD बुलेटीच्या आधारे वर्तवला आहे.
हे वाचलं का?
TukTae Cyclone : मुंबईच्या आकाशात ढगांची गर्दी, महाराष्ट्रावर काय होणार परीणाम?
महाराष्ट्राच्या (Maharashtra) पश्चिम किनारपट्टीवर गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळ धडकलं होतं. या चक्रीवादळामुळे कोकण (Konkan) किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. आजवरचं ते सर्वात मोठं भीषण असं चक्रीवादळ होतं. या चक्रीवादळाला (Cyclone) वर्षही पूर्ण झालेलं नसताना आता यंदाच्या वर्षातील पहिलं चक्रीवादळ हे 15 मे ते 17 मे या कालावधीत महाराष्ट्रात धडकू शकतं. त्यानंतर ते गुजरातच्या दिशेने सरकणार आहे.
ADVERTISEMENT
मुंबईत पावसाच्या सरी
ADVERTISEMENT
अरबी समुद्रात तौकतई चक्रीवादळ आलं आहे. त्याचा परीणाम हा आता मुंबई, नवी मुंबई आणि कोकणात पाहण्यास मिळतो आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. मुंबईच्या निरभ्र आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडला. नवी मुंबईतल्या पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
पावसाचा अंदाज कुठे कुठे वर्तवण्यात आला आहे?
लक्षद्विप बेटांवर 15 तारखेला मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. हा पाऊस 16 मे रोजीही पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
केरळमध्ये काही भागांमध्ये सौम्य, काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.
तामिळनाडूच्या काही भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी आणि काही भागांमध्ये सौम्य सरी पडण्याचा अंदाज आहे.
कर्नाटकातही किनारपट्टीच्या भागावर आणि इतर भागांमध्ये सौम्य आणि मुसळधार सरींचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातल्या कोकणात आणि गोव्यात तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गुजरातमध्येही काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT