तौकताई Cyclone : कोकण किनारपट्टीला सावधानतेचा इशारा, मच्छिमारांना सतर्कतेचे आदेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तौकताई चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, केरळ या राज्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. विशेषकरूर महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी-मालवण आणि देवगड या भागांत या वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने किनारपट्टीलगतच्या भागाची पाहणी करुन नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

ADVERTISEMENT

“आज मध्यरात्रीपासून ते उद्या सकाळी १० वाजेपर्यंत हे वादळ कोकणकिनारपट्टीवरुन जाणार आहे…ज्याचा फटका आपल्याला बसू शकतो. हवामान विभागाने उद्या आणि परवा कोकणात जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या वाऱ्याची गती जास्त असल्यामुळे घरांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टीवरील लोकांना आम्ही स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक मच्छिमारांना पुढील सूचना मिळेपर्यंत बोटी समुद्रात नेऊ नका असे आदेश देण्यात आले आहेत. याव्यतिरीक्त मच्छिमारांनी आपल्या नौका आणि स्थानिकांनी आपली जनावरं व्यवस्थित बांधून ठेवून त्यांची काळजी घ्यावी”, असं आवाहन सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी केलं.

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी मालवण किनारपट्टीची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. रात्री १० वाजल्यापासून किनारपट्टीलगत राहणाऱ्या लोकांनी घराबाहेर न पडता स्थलांतिरत होऊन प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पोलीस अधिक्षक दाभाडे यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्राच्या (Maharashtra) पश्चिम किनारपट्टीवर गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळ धडकलं होतं. या चक्रीवादळामुळे कोकण (Konkan) किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. आजवरचं ते सर्वात मोठं भीषण असं चक्रीवादळ होतं. या चक्रीवादळाला (Cyclone) वर्षही पूर्ण झालेलं नसताना आता यंदाच्या वर्षातील पहिलं चक्रीवादळ हे 15 मे ते 17 मे या कालावधीत महाराष्ट्रात धडकू शकतं. त्यानंतर ते गुजरातच्या दिशेने सरकणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT