बहुरुपी बनून शिक्षक करतोय लसीकरणाबाबत जनजागृती
विशाल ठाकूर: शासनाच्या आवाहनाला शिक्षकांच्या कलाकारीची जोड मिळाली तर काय घडु शकते याचा प्रत्यय नंदुरबारमधल्या एका अवलिया शिक्षकांने घडवला आहे, लोकामध्ये असलेल्या लसीकरणाचे गैरसमज दुर करुन त्यांच्यातील लसीकरणाचे भय काढुन टाकण्यासाठी हा शिक्षक चक्क बहुरुपी बनला असुन कधी वासुदेव, तर कधी शंकर भगवान तर कधी पोलीस कर्मचारी बनुन ते गावातल्या लोकांचे लसीकरण प्रबोधन करत आहे. […]
ADVERTISEMENT
विशाल ठाकूर: शासनाच्या आवाहनाला शिक्षकांच्या कलाकारीची जोड मिळाली तर काय घडु शकते याचा प्रत्यय नंदुरबारमधल्या एका अवलिया शिक्षकांने घडवला आहे, लोकामध्ये असलेल्या लसीकरणाचे गैरसमज दुर करुन त्यांच्यातील लसीकरणाचे भय काढुन टाकण्यासाठी हा शिक्षक चक्क बहुरुपी बनला असुन कधी वासुदेव, तर कधी शंकर भगवान तर कधी पोलीस कर्मचारी बनुन ते गावातल्या लोकांचे लसीकरण प्रबोधन करत आहे.
ADVERTISEMENT
रस्त्यावर नाचुन लसीबाबत प्रबोधन करणारा हे वासुदेव हा नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील बिलाडी गावातल्या जिल्हा परिषद शाळेच मुख्याध्यापक सचिन पत्की आहे. पत्की स्वतः मुख्याध्यापक आहेत. सचिन पत्की वासुदेव बनुन करतात तरी काय असा प्रश्न आपल्याला पडला असेल. हा वासुदेव लोकांकडून काही देत नाही पण आशीर्वादाबरोबरच मास्क, सॅनिटायझर वाटप करतो आणि हात धुण्याचं महत्त्व सांगतो.
हे वाचलं का?
पत्की सर कधी वासुदेव होतात तर कधी शंकर होतात तर कधी पोलीस अधिकारी कर्मचारी होतात. असे बहुरुपी सचिन पत्की हे बिलाडी आणि बामखेडा या दोन गावातील विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणाबाबत काहीसं भितीचं वातावरण आहे. या आदिवासी भागामध्ये आणि ग्रामीण भागात लसीकरणाबाबत गैरसमज दूर करण्याची जबाबदारी ही त्या त्या गावातल्या शाळा शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे गावातल्या लोकांना लसीकरणाचे महत्व विषद करुन घेण्यासाठी बिलाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सचिन पत्की यांनी ही आगळी वेगळी शक्कल लढवली आणि मग सुरु झाला या शिक्षकाचा बहुरुपी होण्याचा प्रवास.
अशी रुपं धारण करुन पत्की हे चौकाचौकात जातात आणि गावकऱ्यांचं प्रबोधन करतात. सारंगखेडा इथले लसीकरण केंद्र प्रमुख वसंत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी आदिवासी बहुल भागामध्ये असलेले भीती पूर्वी या भागात देखील दिसत होती. लोक लसी घेण्यासाठी तितके उत्सुक नव्हते. मात्र आता शिक्षकांनी केलेल्या प्रबोधनामुळे लोक पुढे येऊ लागले आहेत.
ADVERTISEMENT
सध्या कोरोणामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातुनच शिक्षक विद्यार्थ्यांसोबत जोडले जात आहेत. त्यांच्यापासून दूर होते. अशातच गावच्या शाळेचा मास्तर अशी बहुरुपं धारण करुन घरासमोर आले तर विद्यार्थ्यांची मोठी करमणूक होते. विद्यार्थी आणि पालक त्यांचं स्वागत करतात. पण त्याबरोबरच गावकरी आणि ग्रामस्थांची लसीबाबतची भीती दूर होते. सचिन पत्की यांना या साऱ्या कामात शाळेतील अन्य दोन शिक्षक, गावातील अंगणवाडी सेविका आणि आशा ताई मोठी मदत करतात.
ADVERTISEMENT
त्यामुळेच गावातले लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर होऊ लागलं आहे. आता दर गुरुवारी लोक लसीकरणासाठी पुढाकार घेतात. त्यामुळेच सकारात्मक चित्र बामखेडा आणि बिलाडी गावात दिसू लागले आहे. या गावांमधला लसीकरणाचा आकाडा वाढताना दिसतो आहे. त्यामुळेच सचिन पत्की यांच्या कामाबाबत जिल्हाधिकारी यांनी देखील कौतुक केले आहे. बमाखेडा गावचे सरपंच सखाराम पाटील सांगतात की आधी लोक लसीकरणाबाबत काही सांगायला गेलं की शेतात पळून जात. पण आता परिस्थिती बदललीय आता लोक आनंदाने लसीकरणाबाबत ऐकून घेतात आणि लसीकरणासाठी पुढे येतात. आपल्या कलेचा उपयोग लोकशिक्षणासाठी करून सचिन पत्कींनी समाजातील शिक्षकांची असलेली महत्वाची भूमिका अधोरेखित करत इतरांनाही प्रेरणा दिली आहे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT