अमित शाह हुकूमशहा? उद्धव ठाकरेंचं ‘सामना’तून टीकास्त्र, इतिहासाचा अभ्यासही काढला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात अदृश्य हुकुमशाही सुरू असल्याचं उद्धव ठाकरे अनेकदा म्हणालेत. पण आता अमित शाह यांना हुकूमशाह असं संबोधण्यात आलंय. सामनातल्या अग्रलेखात अमित शाहांवर टीका करताना त्यांना हुकूमशाह म्हणण्यात आलंय.

ADVERTISEMENT

लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सारण जिल्ह्यातल्या लोलटोला सीताबदियारा गावाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी भेट दिली. १२० जयंती निमित्त शाहांच्या हस्ते जयप्रकाश नारायण यांच्या भव्य प्रतिमेचं अनावर करण्यात आलं होतं.

याच कार्यक्रमात बोलताना शाहांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका केली. ‘जयप्रकाश नारायण यांच्या अनुयायांनी सत्तेसाठी आपल्या विचारांचे बलिदान दिलं आणि आता ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत’, असं शाह म्हणाले.

हे वाचलं का?

सामना अग्रलेखात अमित शाहांवर काय टीका करण्यात आलीये?

शाहांच्या याच भूमिकेवर सामना अग्रलेखातून टीकास्त्र डागण्यात आलंय. ‘आज इंदिरा गांधींची राजवट बरी असे वाटावे इतके अधःपतन सुरू आहे. जयप्रकाश नारायण आता असते, त्यांनी आणखी एका स्वातंत्र्याचा लढा निर्माण केला असता. जयप्रकाश नारायण मूळचे काँग्रेसीच होते. काँग्रेसमध्ये त्यांनी समाजवादी गटाची स्थापना केल्यामुळे पक्षातील वजनदार गट त्यांच्यावर नाराज होता. तथापि गांधी व पंडित नेहरू या दोघांनाही जयप्रकाश यांच्याबद्दल ममत्व होते, पण जयप्रकाश यांनी काँग्रेस पक्षातही कधी वैचारिक तडजोड केली नाही’, असं सामनात म्हटलंय.

‘इंदिरा गांधी व त्यांचे लोक देशाला एकाधिकारशाही, हुकूमशाहीच्या दिशेने नेत आहेत हे पाहताच लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी इंदिराजींविरोधात रणशिंग फुंकले व त्यांचा पराभव घडवून आणला. या धगधगत्या कालखंडाचा अभ्यास अमित शहा यांनी करायला हवा होता व मगच जयप्रकाश नारायण यांच्या विचारांवर बोलायला हवे होते’, असं म्हणत सामनातून शाहांना खडेबोल सुनावण्यात आलेत.

ADVERTISEMENT

सामना अग्रलेखात असंही म्हटलंय की, ‘आज क्रांतीची भाषा करणाऱ्या राजकीय विरोधकांना देशद्रोही ठरवून तुरुंगात ढकलले जात आहे. त्याच हुकूमशाही हातांनी जयप्रकाश नारायण यांच्या प्रतिमेचे अनावरण करावे ही लोकशाही व स्वातंत्र्याची शोकांतिकाच म्हणायला हवी’, अशा शब्दात टीका केलीये. हुकुमशाही हात म्हणत सामनातून शाहांचा उल्लेख हुकूमशाह असा करण्यत आलाय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT