Thane Police : मुंब्रा पोलीस ठाण्यातील १० पोलीस अधिकारी-कर्मचारी खंडणी प्रकरणी निलंबित
-विक्रांत चौहान, ठाणे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिसांच्या एका प्रकरणानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मुंब्रा पोलीस ठाण्यातील ३ अधिकारी आणि ७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. हे प्रकरण आहे ३० कोटींचा काळा पैसा आणि एका खेळण्याचा व्यापार करणाऱ्या व्यक्तीशी संबंधित. मुंब्रा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या या सात जणांनी एक प्रकरण दाबण्यासाठी तब्बल ६ कोटी घेतल्याची […]
ADVERTISEMENT
-विक्रांत चौहान, ठाणे
ADVERTISEMENT
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिसांच्या एका प्रकरणानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मुंब्रा पोलीस ठाण्यातील ३ अधिकारी आणि ७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. हे प्रकरण आहे ३० कोटींचा काळा पैसा आणि एका खेळण्याचा व्यापार करणाऱ्या व्यक्तीशी संबंधित.
मुंब्रा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या या सात जणांनी एक प्रकरण दाबण्यासाठी तब्बल ६ कोटी घेतल्याची माहिती तपासातून समोर आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर हा सर्व प्रकार उजेडात आला.
हे वाचलं का?
३० कोटी आणि बिल्डरचं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा परिमंडळाचे सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे प्रमुख अशोक कडलक यांची कार्यालयीन चौकशी करण्याचे आदेश ठाणे शहर पोलिसांनी काढण्यात आला होता.
ADVERTISEMENT
या प्रकरणातील आरोपी पोलीस वैद्यकीय रजेवर असून, मुंब्रा पोलीस ठाण्यातील गीताराम शेवाळे, हर्षद काळे आणि मदने यांच्यावर चौकशीनंतर कारवाई केली आहे.
ADVERTISEMENT
गीताराम शेवाळे हे मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हे पोलीस निरीक्षक आहेत. तर हर्षद काळे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. दोघांना १२ एप्रिल रोजी एक माहिती मिळाली होती. ती म्हणजे मुंब्रामधील खेळण्याचा व्यापार करणाऱ्या फैजल मेनन यांच्या घरी काळा पैसा असल्याची.
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मेनन यांच्या घरी धाड टाकली आणि ३० कोटी रुपये जप्त केले. जप्त करण्यात आलेली रक्कम मुंब्रा पोलीस ठाण्यात आणण्यात आली.
याच प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप आहे की त्यांनी हे संपूर्ण प्रकरण दाबण्यासाठी ६ कोटी रुपये घेतले. या सर्व प्रकाराची माहिती इब्राहिम शेख नावाच्या व्यक्तीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला तक्रारीतून दिली होती.
तक्रार दाखल झाल्यानंतर ठाणे शहर पोलीस आयुक्त अविनाश अंभुरे यांनी याचा तपास केला. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्यातील ३ पोलीस अधिकारी आणि ७ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
निलंबित करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी कोण?
पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक रवी मदाने आणि हर्षल काळे. त्याचबरोबर कॉन्स्टेबल पंकज गायकर, जगदीश गावीत, दिलीप कीरपन, प्रवीण कुंभार, अंकुश वैद्य, ललित महाजन आणि निलेश साळुंखे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT