1975 Emergency ची 46 वर्षे पूर्ण, या 12 घटना तुम्हाला माहित आहेत का?
25 जून 1975 ला देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाला आता 46 वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून आजचा दिवस ओळखला जातो. इंदिरा गांधी यांनी आजच्या दिवशी देशात आणीबाणी जाहीर केली आणि राष्ट्रपती राजवट लागू केली. कायदा सुव्यवस्थेचा देशात प्रश्न निर्माण झाला आहे हे कारण […]
ADVERTISEMENT
25 जून 1975 ला देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाला आता 46 वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून आजचा दिवस ओळखला जातो. इंदिरा गांधी यांनी आजच्या दिवशी देशात आणीबाणी जाहीर केली आणि राष्ट्रपती राजवट लागू केली. कायदा सुव्यवस्थेचा देशात प्रश्न निर्माण झाला आहे हे कारण देऊन त्यांनी ही घोषणा केली होती. या निर्णयानंतर देशात 21 महिने आणीबाणी होती. 21 मार्च 1977 पर्यंत ही आणीबाणी लागू होती. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा बारा गोष्टी ज्या तुम्हाला ठाऊक नसतील तर कळू शकणार आहेत.
ADVERTISEMENT
देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणी विषयी 12 महत्त्वाचे मुद्दे
1) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तिसऱ्यांदा देशात आणीबाणी लागू करण्यात आली ती आजच्या दिवशी म्हणजेच 25 जून 1975 ला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हा निर्णय घेतला. ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली.
हे वाचलं का?
2) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली आणीबाणी लावण्यात आली ती 26 ऑक्टोबर 1962 ते 10 जानेवारी 1968 या कालावधीत. या कालावधीत भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं. भारतातील नागरिकांच्या सुरक्षेच्या हेतूने ही आणीबाणी लावली गेली.
३) दुसरी आणीबाणी ही 3 डिसेंबर 1971 मध्ये लावण्यात आली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.
ADVERTISEMENT
4) पाकिस्तानसोबत जे भारताने युद्ध केलं त्यानंतर आपल्या देशात एक प्रकारची अस्थिरता निर्माण झाली. ऑईल क्रायसिस म्हणजेच इंधनाच्या दरांमुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली. याचा परिणाम आपल्या सामाजिक जीवनावरही झाला
ADVERTISEMENT
5) देशाची आर्थिक घडी विस्कटल्याने देशभरात आंदोलनं होऊ लागली ज्यामध्ये सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली
6) इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये जेव्हा आणीबाणीची घोषणा केली तेव्हा त्यांनी एक वीस कलमी आर्थिक कार्यक्रमही जाहीर केला. याचा उद्देश अर्थव्यवस्थेला गती देणं, औद्योगिक आणि शेती क्षेत्राची प्रगती करणं आणि गरीबी तसंच निरक्षरतेशी लढा देणं हा होता.
7) भारतात जेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली होती तेव्हा प्रसारमाध्यमं आणि अनेक वेगळ्या विचारधारांचे राजकीय नेते यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.
8) या कालावधीत ज्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होत्या त्यादेखील पुढे ढकलण्यात आल्या
9) इंदिरा गांधी यांनी कायद्यांमध्येही काही बदल केले, त्यांच्या म्हणण्यानुसार तोपर्यंत लागू असणारे कायदे हे कोणत्याही प्रकरणाचा निकाल देण्यासाठी कमी गतीचे होते.
10) या काळात एकछत्री कारभार करण्याची ताकद इंदिरा गांधी यांना मिळाली
11) या कालावधीत इंदिरा गांधी यांनी जे निर्णय घेतले त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. लोकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं
12) आणीबाणी संपल्यानंतर ज्या लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या त्यामध्ये जनता दलाचा विजय झाला आणि काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT