नाशिकमध्ये खळबळ! महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा जळालेल्या कारमध्ये सापडला मृतदेह

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

ADVERTISEMENT

नाशिक महानगर पालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव डॉ. सुवर्णा वाजे असल्याची माहिती आहे. त्या मनपाच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. विल्होळी परिसरातील स्वतःच्या चारचाकी वाहनात पूर्ण जळालेल्या अवस्थेत आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

वाडीवऱ्हे पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून पोलीस तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. डॉ. वाजे यांचा घातपात झाला की अन्य काही कारणाने ही घटना घडली. हे मात्र पोलीस तपासानंतर समोर येईल.नाशिकमध्ये डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये जळालेल्या अवस्थेत मिळाला आहे.

ADVERTISEMENT

डॉ. सुवर्णा वाजे-जाधव या आरोग्य विभागातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. आज बुधवारी नाशिकमधील वाडीवऱ्हे परिसरातील एका वाहनात त्यांचा मृतदेह सापडला आहे. याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी सध्या घटनास्थळावर दाखल झाले आहेत. नेमका हा प्रकार कशाचा आहे, घातपात की आणखी काही, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, या घटनेने महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नाशिकची नेमकी वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, असा प्रश्न पुन्हा एकदा यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT