नवी मुंबई: डॉक्टरच्या विधवा पत्नीची ‘ती’ याचिका कोर्टाने फेटाळली
मुंबई: आपल्या क्लिनिकमध्ये कोरोना रुग्णांचा उपचार करणाऱ्या डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतरही त्याच्या विधवा पत्नीला शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. याचविषयी विधवेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथे देखील तिला कोणताही दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने यावेळी असं म्हटलं आहे की, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत 50 लाख रुपयांचं विमा कवच हे फक्त त्या प्रायव्हेट […]
ADVERTISEMENT

मुंबई: आपल्या क्लिनिकमध्ये कोरोना रुग्णांचा उपचार करणाऱ्या डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतरही त्याच्या विधवा पत्नीला शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. याचविषयी विधवेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथे देखील तिला कोणताही दिलासा मिळालेला नाही.
कोर्टाने यावेळी असं म्हटलं आहे की, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत 50 लाख रुपयांचं विमा कवच हे फक्त त्या प्रायव्हेट डॉक्टरांसाठी होतं ज्यांची सेवा शासनाकडून कोव्हिड-19 साठी रुग्णांसाठी घेण्यात आली होती.
न्यायमूर्ती एस. जे. कठावल्ला आणि न्यायूर्ती आर. आय. चागला यांनी ही याचिका फेटाळून लावताना असं म्हटलं आहे की, ‘याचिकाकर्ता (विधवा महिला) यांना योजनेसाठी अर्ज करताना हे स्पष्ट करण्याची गरज आहे की, डॉ. भास्कर सुरगाडे यांची सेवा राज्य किंवा केंद्र सरकारने कोव्हिड-19 रुग्णांच्या उपचारासाठी घेतली होती.’
याचिकेनुसार, आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणारे डॉ. भास्कर सुरगाडे यांना नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडून नोटीस देण्यात आली होती की, त्यांनी आपला दवाखाना सुरु ठेवावा. तसचे यावेळी असंही म्हटलं होतं की, जर त्यांनी या आदेशांचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.