सरकारने रूग्णांच्या अंतिम संस्काराचा खर्च उचलावा; अभिनेता सोनू सूदची विनंती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्यावर्षीपासून कोरोनाच्या काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने गरजूंना विविध पद्धतीने मदत केली. तर आता पुन्हा एकदा सोनूने लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांच्या कुटुंबियांना उपचार, औषधं यामुळे फार खर्च होत असल्याचं दिसून येतं. गरीबांना हा खर्च झेपत नाही. त्यामुळे मृत्यूनंतर अंतिम संस्कारांचा खर्च सरकारने उचलावा अशी विनंती सोनू सूदने सरकारकडे केली आहे.

ADVERTISEMENT

यासंदर्भात सोनूने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीयो शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये सोनू सूद म्हणतो, नमस्कार, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. काल रात्री अडीच ते तीन वाजेपर्यंत एका रूग्णाला बेड मिळवून देण्याच्या प्रयत्नात होते. अखेर त्याला बेड मिळाला. त्यानंतर रुग्णाला व्हेंटिलेटरसाठी संघर्ष करावा लागला. पहाटे साडेपाचच्या सुमारास आम्ही त्याला व्हेंटिलेटर मिळवून दिलं पण त्या रुग्णाचं निधन झालं. मग पुन्हा अंतिम संस्कार कऱण्यासाठी संघर्ष सुरु झाला. रूग्णाला स्मशानात जागा मिळत नव्हती त्याचप्रमाणे कुटुंबियांकडे पैसेही नव्हते. आम्ही त्या रूग्णाच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली.”

सोनू पुढे म्हणाला, “त्यावेळी माझ्या मनात एक गोष्ट आली की देशातील प्रत्येक व्यक्ती भले श्रीमंत असो किंवा गरीब, मध्यमवर्गीय कुटूंबाचा असला तरी, त्याचा लढा ऑक्सिजन सिलिंडरसाठी, नंतर बेडसाठी आणि त्यानंतर आयसीयूतील व्हेंटिलेटरसाठी सुरु असतो. काही लोकं ही लढाई हरतात आणि त्यांच्या शेवटच्या स्तरावर पोहोचतात ते म्हणजे स्मशानात. अनेकांना तिथे जागा मिळत नाहीये. त्यामुळे आज मी सर्व सरकारांना हात जोडून विनंती करतो की, अला कायदा लवकरात लवकर आणावा, जेव्हा अंतिम संस्कारांसाठी पैसे लागणार नाही.”

हे वाचलं का?

कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलांचं शिक्षण मोफत व्हावं; सोनूची सरकाला विनंती

आपण दररोज सुमारे तीन ते साडेतीन हजार लोकं गमावतोय. एखाद्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची किंमत सरासरी 15 ते 20 हजार रूपये लागतात. जर सरकारने हा खर्च उचलला तर ज्या कुटुंबांकडे पैसे नाहीत ते आरामात आपल्या कुटूंबातील व्यक्तीचा अंतिम संस्कार करू शकतात, असंही सोनूने सांगितलंय. सोनूच्या या विनंतीवर सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT