The Kashmir Files : “…, पण ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाने सगळा सत्यनाश केला”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आलेल्या द कश्मीर फाईल्स चित्रपटावरून आता बरंच वादंग निर्माण झालं आहे. चित्रपटातून चुकीच्या गोष्टी दाखवण्यात आल्याचा आरोप होतं आहे. त्यातच आता जम्मू कश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दु्ल्ला यांनी द कश्मीर फाईल्स चित्रपटावर निशाणा साधला आहे. चित्रपटाने सगळा सत्यनाश करून टाकला, अशी टीका अब्दुल्ला यांनी केली आहे.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाईल्स सध्या बॉक्स ऑफिसबरोबरच बॉक्स ऑफिसच्या बाहेरही चर्चेत आहे. हा चित्रपट एक प्रकारचा प्रपोगंडा असल्याचा आरोप होत असून, आता ओमर अब्दुल्ला यांनीही चित्रपटावरून टीकास्त्र डागलं आहे.

“द कश्मीर फाईल्स दहशतवाद्यांचा कट असू शकतो, कारण…”; भाजपच्या मित्रपक्षाचा गंभीर आरोप

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ओमर अब्दुल्ला म्हणाले, “द कश्मीर फाईल्स चित्रपट सत्य वस्तुस्थितीपासून खूप वेगळा आहे. हा एक माहितीपट असता तर समजू शकलो असतो. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचं निर्मात्यांनी म्हटलेलं आहे. मात्र सत्य हे आहे की या चित्रपटात अनेक गोष्टी चुकीच्या दाखवल्या गेल्या आहेत.”

“सगळ्यात मोठं खोटं हे आहे की, त्यावेळी जम्मू कश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार होतं असं चित्रपटात दाखवलं गेलं आहे. पण, सत्य हे आहे की, त्यावेळी जम्मू कश्मीरमध्ये राज्यपाल राजवट होती. त्यावेळी केंद्रात व्ही.पी. सिंह यांचं सरकार होतं आणि त्या सरकारला भाजपचा पाठिंबा होता,” असं अब्दुल्ला म्हणाले.

ADVERTISEMENT

‘The Kashmir Files’ चे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्रींना Y दर्जाची सुरक्षा

ADVERTISEMENT

कश्मिरी पंडितांबरोबरच मुस्लिमांना, शिखांनाही पलायन करावं लागलं होतं. त्यांचेही प्राण गेले होते. कश्मिरी पंडितांनी कश्मीर खोऱ्यातून जाणं वाईट घटना होती. कश्मिरी पंडितांना पुन्हा कश्मिरात आणण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सकडून प्रयत्न केले जात होते, मात्र द कश्मीर फाईल्स चित्रपटाने त्या योजनेचा सत्यनाश केला”, असं अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

द कश्मीर फाईल्स चित्रपटाच्या निर्मात्यानांच कश्मीर पंडित पुन्हा कश्मीर खोऱ्यात परतू नयेत, असं वाटतंय असा गंभीर आरोप अब्दुल्ला यांनी केला आहे.

कपिल शर्माने ‘द कश्मीर फाईल्स’चं प्रमोशन करायला नकार दिला?; अनुपम खेर यांनी सांगितलं सत्य

द कश्मीर फाईल्स राजकीय वादाचा मुद्दा ठरला असून, चित्रपटावरून भाजप विरुद्ध इतर पक्ष असं चित्रही दिसतं आहे. शिवसेनेनंही चित्रपटावरून भाजपवर निशाणा साधलेला आहे. आगामी चार राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे भाजपला कश्मिरी पंडितांची आठवण झाली, अशी टीका खासदार संजय राऊतांनी गेल्या आठवड्यात केली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT