Vaccine Shortage- मुंबईतल्या BKC मधलं सर्वात मोठं लसीकरण केंद्र बंद
मुंबईतल्या BKC मधलं लसीकरण केंद्र बंद झालं आहे. लसी संपल्यामुळे हे केंद्र बंद करण्यात आलं आहे. 45 वर्षे आणि त्यावरचे लोक दुसरा डोस घेण्यासाठी आले होते. लसी संपल्याने त्यांचा संताप झाला. आज सकाळी बीकेसीमधल्या लसीकरण केंद्रावर फक्त 900 डोस होते. ते डोस संपल्याने या केंद्रावरचं लसीकरण केंद्र बंद करण्यात आलं. महाराष्ट्रात दोन दिवसात घटलं लसीकरणाचं […]
ADVERTISEMENT
मुंबईतल्या BKC मधलं लसीकरण केंद्र बंद झालं आहे. लसी संपल्यामुळे हे केंद्र बंद करण्यात आलं आहे. 45 वर्षे आणि त्यावरचे लोक दुसरा डोस घेण्यासाठी आले होते. लसी संपल्याने त्यांचा संताप झाला. आज सकाळी बीकेसीमधल्या लसीकरण केंद्रावर फक्त 900 डोस होते. ते डोस संपल्याने या केंद्रावरचं लसीकरण केंद्र बंद करण्यात आलं.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दोन दिवसात घटलं लसीकरणाचं प्रमाण, अवघ्या 1 लाख 27 हजार जणांचं लसीकरण
BKC चे कोव्हिड सेंटरचे डीन यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पुढील लसी कधी येतील ते माहित नाही असं सांगितलं आहे. चार दिवसांनी आज 45 वर्षे आणि त्यावरील लोकांसाठी लसीकरण सुरू झालं होतं आणि ते अवघ्या काही तासातच बंद झालं. तीन तासांमध्ये लसीकरण बंद करण्यात आलं कारण 900 लसी या अवघ्या तीन तासांमध्ये संपल्या. BKC मधलं जंबो व्हॅक्सिनेशन सेंटर हे देशातलं सर्वात मोठं लसीकरण केंद्र आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लस घेण्यासाठी इथे लोक आले होते. लस संपल्याने अनेक लोकांनी नाराजी वर्तवली आहे.
हे वाचलं का?
महाराष्ट्राला केंद्राकडून कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचा पुरवठा, जाणून घ्या किती लसी मिळणार?
महाराष्ट्रातल्याही अनेक लसीकरण केंद्रांवरही लसीकरण बंद करण्यात आलं आहे. कारण लसीकरण केंद्रं बंद आहेत. महाराष्ट्रात अवघ्या दोन दिवसांमध्ये 1 लाख 27 हजार लोकांनाच लसीकरण करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात 26 एप्रिलला पाच लाख जणांना लस देण्यात आली. एका दिवसात पाच लाख लसी देण्याचं रेकॉर्ड महाराष्ट्राने करून दाखवला. मात्र आता लस तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत असल्याने अनेक केंद्रांवरचं लसीकरण बंद करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
नांदेड- व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून मित्रांनी उभारलं कोव्हिड सेंटर
ADVERTISEMENT
काय आहेत लसीकरण कमी होण्याची कारणं?
अनेक केंद्रांवर लसी उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहीम थांबवण्यात आलेली आहे
महाराष्ट्रातल्या अनेक केंद्रांवर 18 ते 44 या वयोगटासाठी लसी उपलब्ध नाहीत
महाराष्ट्रातल्या अनेक केंद्रांवर 45 वर्षे आणि त्यापुढील वयोगटासाठीही लसी उपलब्ध नाहीत कारण केंद्राकडून साठा आलेला नाही
राजेश टोपे यांनी दिवसाला 5 ते 6 लाख लसी देऊ शकतो अशी क्षमता असल्याचं सांगितलं होतं मात्र तेवढ्या लसीच आलेल्या नाहीत त्यामुळे तुटवडा असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली होती
1 मे 2021 पासून 18 ते 44 या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली खरी मात्र त्यासाठी लसीच उपलब्ध नसल्याचं चित्र अनेक केंद्रांवर आहे.
महाराष्ट्रात दोन दिवसात एकूण 1 लाख 27 हजार 184 जणांचं लसीकरण होऊ शकलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT