अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या ‘या’ सैनिकाचा फोटो का होतोय व्हायरल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काबूल: हातात बंदूक, मान थोडशी खाली झुकलेली आणि विमानाच्या दिशेने हळूवार पावलं टाकत अमेरिकेच्या शेवटच्या सैनिकाने अफगाणिस्तान सोडलं. ज्याचा फोटो सध्या बराच व्हायरल होत आहे. जवळजवळ 20 वर्ष अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेन सैन्याची सुरु असलेली मोहीम संपुष्टात आली आहे. मंगळवारी अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले की, त्यांचे सर्व सैनिक आता अफगाणिस्तानातून परत आले आहेत आणि मिशन पूर्णपणे संपले आहे.

ADVERTISEMENT

दहशतवाद संपवण्याची शपथ घेऊन अमेरिकन लष्कर 19 वर्ष, 10 महिने आणि 10 दिवस अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून होता. मात्र, तालिबानच्या ताब्यात देश सोपवून अमेरिकाला अखेर बाहेर पडावं लागलं आहे. खुद्द अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या शेवटच्या जवानाचा परतीचा फोटो ट्विट केला आहे.

काबूलमधील अमेरिकेचे मिशन संपले – US संरक्षण मंत्रालय

हे वाचलं का?

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने फोटो ट्विट करून लिहिले, ‘अफगाणिस्तान सोडणारा शेवटचा अमेरिकन सैनिक. मेजर जनरल ख्रिस डोनह्यू 30 ऑगस्ट रोजी C-17 विमानात परतत आहेत. यासह, काबूलमधील अमेरिकेचे मिशन संपले.’

मिशन संपल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनीही याबाबत आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, गेल्या 17 दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. गेल्या 17 दिवसात आमच्या सैनिकांनी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे एअरलिफ्ट मिशन पार पाडले. यामध्ये 120,000 लोकांना बाहेर काढण्यात आले. यात अमेरिकन नागरिक तसेच आमच्या मित्र देशातील नागरिक आणि अफगाण सहयोगी यांचा समावेश होता.’

ADVERTISEMENT

यापुढे अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे राजदूत देखील उपस्थिती नसतील. तसंच तेथील दूतावास देखील तूर्तास बंद करण्यात आले आहे. अफगाणिस्तानशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी आता यासंबंधीचे काम दोहा किंवा कतारमधून केले जाणार आहे.

ADVERTISEMENT

असे सांगण्यात आले आहे की, अमेरिका यापुढे अफगाणमधील लोकांना थेट मदत करणार नाही, परंतु हे काम स्वायत्त संस्थांद्वारे केले जाईल. यामध्ये UN एजन्सी आणि इतर स्वयंसेवी संस्थांचा (NGO)चा समावेश आहे. यावेळी अमेरिकेने आशा व्यक्त केली आहे की, तालिबान किंवा इतर या स्वायत्त संस्थांना अडथळे निर्माण करणार नाहीत.

दरम्यान, मागील काही महिन्यांपासूनच अमेरिकेने आपले सैन्य माघारी बोलवण्यास सुरुवात केली होती. ज्याचा फायदा घेऊन तालिबानने अवघा अफगाणिस्तान हातात घेतला होता. एवढंच नव्हे तर त्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूल देखील ताब्यात घेतलं. ज्यामुळे यापुढे अफगाणिस्तानमध्ये फक्त तालिबानचीच सत्ता असणार यावर शिक्कामोर्तब झालं.

जेव्हा Miss अफगाणिस्तान परिधान करते Bikini…

दुसरीकडे देश तालिबान्यांच्या हातात जाण्यासाठी अमेरिकाच जबाबदार असल्याचं अफगाणी लोकांनी म्हटलं होतं. अमेरिकेने आपलं सैन्य हटविल्यानंतर तालिबान्यांनी झपाट्याने देश ताब्यात घेतला. ज्यानंतर अफगाणी जनतेने अक्षरश: याविरोधात आक्रोश सुरु केला. विशेषतः अफगाणी महिलांना आपल्या भविष्याबाबत प्रचंड चिंता सतावू लागली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT