Narendra Dabholkar हत्या प्रकरण: 8 वर्षे उलटली, मास्टरमाईंड मोकाटच! काय आहे प्रकरण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आठ वर्षांपूर्वी विवेकवादी विचारांचे कार्यकर्ते आणि अंनिसचे प्रमुख नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 20 ऑगस्ट 2013 ला डॉ. नरेंद्र दाभोलकर हे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. तेव्हा बाईकवरून दोन अज्ञातांनी येऊन त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर आणखी तीन घटना अशाच प्रकारे घडल्या. डाव्या विचारांचे गोविंद पानसरे यांची फेब्रुवारी 2015 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर MM कलबुर्गी यांची ऑगस्ट 2015 मध्ये हत्या करण्यात आली, पत्रकार गौरी लंकेश यांची सप्टेंबर 2017 मध्ये अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली. दाभोलकर यांच्या हत्येला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत तरीही या प्रकरणाचा सूत्रधार सापडलेला नाही.

ADVERTISEMENT

1980 च्या दशकात नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरू केलं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीही त्यांनी स्थआपन केली. साधारणतः दहा वर्षे डॉक्टरकी केल्यानंतर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य सुरू केलं. देव, धर्म यांच्या नावाखाली होणारं शोषण, माजवली जाणारी बजबजपुरी या सगळ्यावर सिद्धांतिक पणे कोरडे ओढण्यास सुरूवात केली. अंधश्रद्धेची समाजात रूजलेली पाळंमुळं त्यांनी उखडून टाकण्यास सुरूवात केली.

हे वाचलं का?

अंगात येणं, भूतबाधा, जादूटोणा, करणी याच्या नावे चालणारं शोषण आपल्या प्रयोगांमधून उघडं पाडत त्या कुप्रथा बंद कशा होतील यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. समाजात अनेक वर्षांपासून लोक रूढी, परंपरा, अंधश्रद्धा या सगळ्यांचा चिटकून बसले होते. त्याविरोधात दाभोलकरांनी विवेकाचा आवाज बुलंद केला. अर्थात ही चळवळ उभी करणं सोपं नव्हतं त्यांना विविध धार्मिक संघटना, राजकीय पक्ष यांचा रोष आणि विरोध पत्करावा लागला. एवढंच नाही तर ज्या जादूटोणा विरोधी कायद्याची मागणी ते करत होते त्यालाही विलंब करण्यात आला. खेदाची बाब ही आहे की जो कायदा व्हावा यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं तो त्यांना संपवल्यानंतर मंजूर करण्यात आला.

ADVERTISEMENT

नरेंद्र दाभोलकर हे उदारमतवादी विचारांचे होते. साप्ताहिक साधनाचे ते दीर्घकाळ संपादकही होते. लोकांमध्ये विज्ञानवादी दृष्टीकोन कसा वाढीला लागेल यासाठी त्यांनी त्यांच्या परिने पूर्ण प्रयत्न केले. विविध गोष्टी आपल्या प्रयोगांसह त्यांनी सिद्ध करून दाखवल्या आणि लोकांना अंधश्रद्धेच्या विरोधात आरसा दाखवण्याचं काम केलं. महाविद्यालयीन काळात दाभोलकर उत्कृष्ट कबड्डीपटूही होते, त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. 20 ऑगस्ट 2013 ला पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळ असलेल्या पुलावर मॉर्निंग वॉकला नरेंद्र दभोलकर गेले होते तेव्हा दोन अज्ञातांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे.

ADVERTISEMENT

दाभोलकर प्रकरणात पुणे पोलिसांनी पहिली अटक मनिष नागोरीला केली. मनिष नागोरीने दाभोलकरांच्या हत्येसाठी बंदुक विकल्याचा आरोप आहे. मनिष नागोरी आणि विलास खंडेलवाल अशी अटक कऱण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. ऑक्टोबर 2013 मध्ये या दोघांना दहशतवादविरोधी कोठडीत पाठवण्यात आलं. काडतुसांबाबत एटीएसने जेव्हा पुणे पोलिसांना लिहिलं होतं त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर काही कालावधीने या दोघांवर अज्ञात व्यक्तीच्या हत्येचा आणि दाभोलकर यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला.

2014 मध्ये नवा ट्विस्ट

21 जानेवारी 2014 ला नागोरी आणि खंडेलवाल या दोघांना कोर्टात हजर केलं असता त्यांनी हा आरोप केला की तत्कालीन एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येची कबुली देण्यासाठी 25 लाख रूपये आम्हाला देऊ केले होते. यानंतर झालेल्या सुनावणी दरम्यान आम्ही भावनेच्या भरात राकेश मारियांवर आरोप केल्याचं या दोघांनी म्हटलं. काही महिन्यांची या दोघांचीही न्यायालयाने जामिनावर सुटका केली. या प्रकरणा त्यांच्यावर कधीही चार्जशीट दाखल झाली नाही.

जून 2014 मध्ये बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयकडे दाभोलकर हत्येचा तपास आला. सीबीआयने जून 2016 मध्ये सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या डॉ. वीरेंद्र तावडेला अटक केली. सीबीआयने अटक करण्याआधी महाराष्ट्र पोलिसांनीही त्याला अटक केली होती. संजय साडविलकर यांनी दिलेल्या साक्षीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. वीरेंद्र तावडे या प्रकरणाचा मास्टरमाईंडपैकी एक आहे असंही सीबीआयने म्हटलं होतं.

CBI ने हा दावाही केला की नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या अंनिसचे कार्यकर्ते यांच्याशी सनातन संस्थेचं वैर आहे. हे वैर हाच दाभोलकरांच्या हत्येमागचा हेतू आहे. सीबीआयने या प्रकरणात दोन हल्लेखोर हे सनातनशी संबंधित होते आणि त्यांची नावं सारंग अकोलकर आणि विनय पवार अशी होती हे देखील सांगितलं. मात्र 2018 मध्ये सीबीआयने हिंदुत्ववादी कार्यकर्ते सचिन अंदुरे आणि शरद काळसकर या दोघांना अटक केली. या दोघांनीच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या असंही सीबीआयनं म्हटलं.

मे 2019 मध्ये सीबीआयने सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांनाही अटक केली. या सगळ्यांवर आरोपपत्रही दाखल करण्यात आलं. मात्र पुनाळेकर हे जामिनावर बाहेर आहेत. इतर चार जण तुरुंगात आहे. सीबीआयने अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगारा यांनाही अटक केली. 2017 मध्ये झालेल्या गौरी लंकेश हत्या प्रकरणा हे तिघे आरोपी आहेत मात्र यांच्याविरोधात चार्जशीट फाईल करण्यात आलेली नाही.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चौघांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये कॉमन लिंक असल्याचं सांगितलं जातो. ज्यामध्ये काही गुन्हेगार आणि बंदुकी यांचा समावेश आहे. नागोरी आणि खंडेलवाल सीबीआयच्या तपासात सापडले नाहीत किंवा एजन्सीने अद्याप पर्यंत त्यांच्याकडून जप्त केलेल्या बंदुकीबाबत काही उल्लेखही केलेला नाही.

शस्त्रांच्या तपास करत असताना सीबीआयने वकील पुनाळेकर यांना अटक केली की त्यांनी दाभोलकर आणि गौरी लंकेश यांच्यासह अनेक खुनांमध्ये वापरलेली बंदुक नष्ट करण्याचा सल्ला आरोपी काळसकरला दिला होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, पुनाळेकरांच्या सूचनेनुसार, काळसकरने कथितपणे चार देशी बनावटीची पिस्तुले उध्वस्त केली होती आणि भाग 7 जुलै 2018 रोजी ठाण्याजवळील अरबी समुद्राच्या एका खाडीच्या पुलावरून फेकला होता. आता या प्रकरणातले अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. या प्रकरणी तपास हा अद्यापही संपलेला नाही. तसंच विवेकाचा आवाजही शांत झालेला नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT