समीर वानखेडे यांच्या निकाहनाम्यावर दाऊद नाव कसं आलं? ज्ञानेश्वर वानखेडेंनी दिलं उत्तर..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

समीर वानखेडे यांचा निकाहनामा खरा आहे पण आम्ही सगळे हिंदू आहोत. मी, मुलगा आणि माझी मुलगी हे आमचं छोटंसं कुटुंब आम्ही तिघेही हिंदू आहोत. माझी पत्नी मुस्लिम होती असं आता समीर वानखेडे यांच्या वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी स्पष्ट केलं आहे. समीर वानखेडे यांनी खोटी कागदपत्रं दिल्याचा आरोप केला होता. आता समीर वानखेडे यांच्या वडिलांनी निकाहनाम्यावर दाऊद नाव कसं आलं याचं उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

समीर वानखेडे यांचा निकाहनामा खरा आहे. त्यामध्ये जे नाव दाऊद असे लिहिण्यात आले आहे त्याबाबत विचारलं असता ज्ञानेश्वर वानखेडे यांनी म्हटलं आहे की ते माझ्या पत्नीने लिहिलं असावा. मला उर्दू समजत नाही ते नाव उर्दूत लिहिलेलं आहे. माझे नाव ज्ञानदेव आहे. दाऊद नाही, कदाचित माझ्या लग्नाच्या वेळी तिने हे नाव लिहिलं असेल असंही ज्ञानेश्वर वानखेडेंनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

मी काहीही लपवलेलं नाही. मी जन्माने हिंदू आहे. मी नवाब मलिक यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे काऱण त्यांनी माझी नाहक यथेच्छ बदनामी केली आहे. ते माझ्या विषयीची अत्यंत व्यक्तिगत माहिती समोर आणून मला आणि माझ्या कुटुंबीयांना बदनाम करत आहेत. मी निकाहनाम्यावर सही केली आहे. तिथे माझं नाव दाऊद लिहिलं गेलं होतं याची कल्पना मला नव्हती असंही ज्ञानेश्वर यांनी म्हटलं आहे.

ज्या अभिनेत्रींना बोलावलं गेलं त्यांना अटक झाली नाही, मालदिव दौऱ्याच्या खोलात जा -नवाब मलिक

ADVERTISEMENT

‘आज ते काहीही म्हणत असले, तरी निकाह वेळी समीर मुस्लीम होते. शबाना मुस्लीम होती. लोखंडवाला येथे मोठं मोठे लोक तिथे लग्न करतात. तिथे दोन हजार लोक असतील. पंधरा मिनिटात निकाह लावून काझी परत जातो. इस्लामी पद्धतीने हा विवाह झाला. सगळे मुस्लीम होते. साक्षीदार मुस्लीम होते. वकील मुस्लीम होते आणि आईवडील सुद्धा मुस्लीम होते. जर मुलगा वा मुलगी हिंदू असल्याचं कळलं असतं, तर काझींनी निकाह लावला नसता. शरियतमध्ये अशा स्थितीत निकाह होत नाही. शरियतच्या विरोधात काझी करू शकत नाही. त्यावेळी दोघेही मुस्लीम होते’, असं मौलाना मुजम्मिल अहमद यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

समीर वानखेडे यांचा डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत 2006 मध्ये निकाह झाला होता. त्यानंतर त्यांचा 2016 मध्ये सहमतीने तलाक झाला होता. समीर वानखेडे यांनी 2017 मध्ये दुसऱ्यांदा विवाह केला. अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी ते दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT