Nana Patole Exclusive: ‘तर राहुल गांधींनी महाविकास आघाडी सरकार बनूच दिलं नसतं’, नाना पटोलेंचा खुलासा
मुंबई: ‘काँग्रेसने कायम देशाच्या हिताचेच निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आजही काँग्रेस लोकांच्या मनात आणि हृदयात आहे. जर राहुल गांधी यांच्या मनात नसतं तर त्यांनी महाविकास आघाडी सरकार होऊच दिलं नसतं.’ असा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या Exclusive मुलाखतीत केला आहे. पाहा नाना पटोले नेमकं काय म्हणाले ‘मन की बात’ ही गांधी […]
ADVERTISEMENT
मुंबई: ‘काँग्रेसने कायम देशाच्या हिताचेच निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आजही काँग्रेस लोकांच्या मनात आणि हृदयात आहे. जर राहुल गांधी यांच्या मनात नसतं तर त्यांनी महाविकास आघाडी सरकार होऊच दिलं नसतं.’ असा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या Exclusive मुलाखतीत केला आहे.
ADVERTISEMENT
पाहा नाना पटोले नेमकं काय म्हणाले
‘मन की बात’ ही गांधी परिवारात कधीही मानली गेलेली नाही. मन की बात ही फक्त तिकडेच मांडली जाते दाढीवाल्या बाबांकडून. काँग्रेसने देशाच्या हिताचेच निर्णय घेतलेले आहेत. म्हणून आजही काँग्रेस लोकांच्या मनात आणि हृदयात आहे. राहुल गांधींच्या मनात असतं तर त्यांनी हे सरकारच होऊ दिलं नसतं.’
हे वाचलं का?
‘आमच्या नेत्या सोनिया गांधींनी सुरुवातीलाच सांगितलं की, आम्ही या सरकारमध्ये आहोत ते म्हणजे फक्त भाजपला रोखण्यासाठी. सरकार टिकवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते टिकवणार. त्यामुळे राहुल गांधी यांनी मला काही या पद्धतीच्या सूचना दिलेल्या नाहीत.
ADVERTISEMENT
‘मी पक्षाचं, संघटनेचं काम करतो आहे. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना मांडणं सरकार समोर मांडणं हे माझं कर्तव्य आहे. ते मी मांडतो आहे.’
ADVERTISEMENT
‘आमचं टार्गेट राष्ट्रवादी किंवा शिवसेना नाही. आमचं टार्गेट भाजप आहे. भाजप ज्या पद्धतीने या देशाला ज्या पद्धतीने उद्धवस्त करायला निघालेली आहे, महागाई वाढून लोकांना आर्थिकदृष्ट्या कमजोर करत आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी आम्ही या सरकारमध्ये आहोत.’ असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे.
‘शरद पवार मोठे आहेत मी पण त्यांच्याबाबत वक्तव्य करणार नाही’
‘शरद पवार मोठे आहेत मी पण त्यांच्याबाबत वक्तव्य करणार नाही. एक असतं की, ज्या झाडाला फळ लागतात त्याच झाडाला दगडं मारली जातात. आता तुम्ही एक लक्षात घ्या की, काही जण आतापर्यंत म्हणत होते की, नाना पटोले यांना आम्ही महत्त्व देत नाही. पण आता नाना पटोलेंच्या वक्तव्याला महत्त्वा आलं आहे याचा अर्थ काँग्रेस महाराष्ट्रात पुढे जात आहे.’ असं नाना पटोले यावेळी म्हणाले आहेत.
‘लोणावळ्यात बोललो ते मी केंद्रबाबत’
‘लोणावळ्यात जे मी बोललो ते केंद्राबाबत होती. मी आयबीचा रिपोर्ट म्हटलं होतं. तसंच वाळू सरकण्याबाबत बोललो तेही भाजपबद्दल होतं. भाजपची अस्वस्थता वाढली आहे. सत्ता गेल्याने ते अस्वस्थ झाले आहे. मात्र सध्या भाजपचा तोल सुटला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारची चुकीची वक्तव्य होतं.’ माझे आरोप राज्य सरकारवर नाही तर केंद्र सरकारवर होते असं सांगत नाना पटोले यांनी माध्यमांवर या प्रकरणाचं खापर फोडलं आहे.
CM Uddhav Thackeray माझ्यावर पाळत ठेवत आहेत, नाना पटोलेंचा गंभीर आरोप
‘काँग्रेसचं महत्त्व महाराष्ट्रात वाढत आहे’
‘माझ्या वक्तव्याला महत्त्व आलं याचाच अर्थ हा होतो की काँग्रेसचं महत्त्व महाराष्ट्रात वाढतं आहे. रविवारी शरद पवार यांनीही म्हटलं आहे की पक्ष वाढवणं आणि सरकार चालवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.’
‘पक्ष वाढवणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांनी जे कामाला लागा असं कार्यकर्त्यांना सांगितलं त्याचं मी स्वागतच केलं. मी जनतेची लढाई लढतो आहे, रात्री ३ वाजेपर्यंत माझी आणि काँग्रेस पक्षाची वाट बघत असतील तर माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी चांगलीच गोष्ट आहे. भाजपच्या पायाखालची वाळू यामुळे सरकणं साहजिक आहे.’ असंही नाना पटोले यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT