कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांना सर्वाधिक धोका? AIIMS च्या डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतो आहे. काही राज्यांत परिस्थिती नियंत्रणात येत असली तरीही अनेक राज्यांत आजही लॉकडाउन लावण्यात आलेलं आहे. त्यातच तज्ज्ञांनी येणाऱ्या काळात भारतात तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होऊन त्यांना याचा सर्वाधिक फटका बसेल अशा बातम्याही गेल्या काही दिवसांपासून समोर येत होत्या. परंतू AIIMS रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.

ADVERTISEMENT

“पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतली रुग्णसंख्येची आकडेवारी तुम्ही पाहिलीत तर ती बऱ्याच अंशी सारखी आहे. लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी असते, जरी लहान मुलांना कोरोनाची लागण झाली तरीही त्यांच्यातली लक्षणं सौम्य असतात. हा विषाणू तोच आहे, त्यात कोणताही बदल नाहीये. सध्यातरी अशी कोणतीच लक्षण समोर आलेली नाहीयेत की ज्यावरुन तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असेल असं समोर आलंय.”

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. गुलेरिया यांनी आज महत्वाची माहिती दिली. “ज्या माध्यमातून हा विषाणू शरिरात प्रवेश करतो ते Ace receptors हे मोठ्या माणसांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये कमी असतात…म्हणूनच लहान मुलांना कोरोनाची लागण होत नाही असा आतापर्यंतचा निष्कर्ष आहे. आतापर्यंत आमच्याकडे जी आकडेवारी आली आहे त्यावरुन तिसऱ्या लाटेत मुलांना कोरोनाचा जास्त धोका आहे असं वाटत नाही. जी लोकं ही थेअरी मांडत आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत मुलांना या विषाणूचा फारसा त्रास झाला नाही म्हणून तिसऱ्या लाटेत मुलांना याचा धोका असू शकतो. परंतू अद्याप अशी आकडेवारी किंवा पुरावे समोर आलेले नाहीत.”

हे वाचलं का?

धक्कादायक… कोरोनाच्या विळख्यात चिमुकले, ‘या’ जिल्ह्यात तब्बल 374 मुलांना कोरोनाची लागण

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT