Tauktae Cyclone : महाराष्ट्रातील या दोन जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसणार

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रासह, गोवा, कर्नाटक, केरळ आणि गुजरात या राज्यांवर सध्या तौकताई वादळाचं संकट घोंगावतं आहे. सध्या गोव्याच्या काही किलोमीटर पाठीमागे असलेल्या या चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही फटका बसणार असून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. हवामान विभागाने चक्रीवादळाच्या सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

सध्या हे चक्रीवादळ गोव्यापासून २५० किलोमीटर दूर असून महाराष्ट्रात याचा सर्वाधिक फटका हा गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना बसणार आहे. कोकण किनारपट्टीजवळून हे वादळ जाणार असल्यामुळे हे दोन जिल्हे चक्रीवादळाच्या प्रभावाखाली येतील अशी माहिती हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शिवांगी भुते यांनी दिली. याव्यतिरीक्त महाराष्ट्रात हे वादळ धडकणार नसून १८ तारखेला हे वादळ गुजरातमधील पोरबंदरचा किनारा ओलांडेल. या परिस्थितीमुळे १६ आणि १७ तारखेला कोकणात मुसळधार पाऊस पडून जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. ताशी ६० ते ७० च्या वेगाने हे वारे वाहण्याचा अंदाज असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

याव्यतिरीक्त १६ आणि १७ तारखेला मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि घाटमाथ्यावरील काही भागांमध्येही पाऊस पडेल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून गोव्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. याव्यतिरीक्त मच्छिमार बांधवांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान हवामान विभागाने इशारा दिल्यानंतर सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने किनारपट्टी भागाची पाहणी करुन सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

हे वाचलं का?

तौकताई Cyclone : कोकण किनारपट्टीला सावधानतेचा इशारा, मच्छिमारांना सतर्कतेचे आदेश

दरम्यान रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट देऊन समुद्रात गेलेल्या बोटींविषयी माहिती घेतली. तसेच मच्छिमारांना पुढील दोन दिवस आवश्यक ती काळजी घेऊन समुद्रात न उतरण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT