Union Budget 2023 : अर्थसंकल्पातील हे आहेत महत्वाचे मुद्दे
Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला (Union Budget) . यात प्रामुख्याने (Income Tax) आयकरमध्ये सूटची घोषणा ही बाब महत्वाची राहिली (Important things). अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, नवीन करप्रणालीनुसार वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपयेपर्यंत असणाऱ्यांना कर भरावा लागणार नाही. यासह अर्थमंत्र्यांनी आत्तापर्यंतचा सर्वात मोठा […]
ADVERTISEMENT

Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला (Union Budget) . यात प्रामुख्याने (Income Tax) आयकरमध्ये सूटची घोषणा ही बाब महत्वाची राहिली (Important things). अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, नवीन करप्रणालीनुसार वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपयेपर्यंत असणाऱ्यांना कर भरावा लागणार नाही. यासह अर्थमंत्र्यांनी आत्तापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे बजेट सादर केला. रेल्वेसाठी अर्थसंकल्पात 2.40 लाख कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली. जो 2014 च्या तुलनेत नऊ पट आहे. यासह सरकारने पुढील आर्थिक वर्षासाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतुदीची घोषणा केली, जी मागच्या वर्षीच्या तुलनेत 33% आहे. तर पाहूया आजच्या अर्थसंकल्पाचे काही ठळक मुद्दे. (These are the important issues in the budget)
Budget 2023 : निर्मला सीतारमन यांनी मांडलेले अर्थसंकल्पातील 10 महत्त्वाचे मुद्दे
निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. 7 लाख पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना आयकर भरायची गरज नसणार आहे. मात्र ही सुविधा नवीन करप्रणाली स्वीकारणाऱ्या करदात्यांना मिळणार आहे. जुन्या टॅक्स प्रणालीप्रमाणे अजूनही 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नात कारमध्ये सूट आहे.
टॅक्स स्लॅबमध्ये केले बदल
सरकारने नवीन टॅक्स प्रणालीनुसार इन्कम टॅक्स स्लॅबमध्येही बदल केले आहेत. व्यक्तिगत आयकरचे नवीन टॅक्स दर आता 0 ते 3 लाख रुपये वार्षिक उत्पन्नपर्यंत 0, 3 ते 6 लाख रुपयेपर्यंत 5 टक्के, 6 ते 9 लाख रुपयेपर्यंत 10टक्के, 9 ते 12 लाखपर्यंत 15 टक्के, 12 ते 15 लाखपर्यंत 20टक्के आणि 15 लाखाच्या वर उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के कर भरावा लागणार आहे.










