खळबळजनक! ‘समीर वानखेडेंना अडथळा निर्माण करू नका, अन्यथा…; नवाब मलिकांना धमकी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिक यांना धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील कार्यालयात सकाळी 7.15 दरम्यान हा फोन आला असून सुरेश हुडा, असे या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती आहे. हा फोन राजस्थानमधून केल्याचेही पुढे आले आहे. दरम्यान, फोन करणाऱ्या व्यक्तीने समीर वानखेडे चांगले काम करत आहेत. त्यांना अडथळा निर्माण करू नका, अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी नवाब मलिकांना दिली आहे.

ADVERTISEMENT

आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. नवाब मलिक यांनी क्रूजवर टाकण्यात आलेल्या छाप्यावर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. कोरोना काळात सगळे सेलिब्रिटी मालदीवमध्ये असताना समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय मालदीवमध्ये होते, असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला होता. तसेच त्यासंदर्भातले फोटोदेखील आपण देणार असल्याचे नवाब मलिक म्हणाले होते. याप्रकरणात समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे थेट आव्हान मंत्री नवाब मलिक यांनी दिले होते.

काल नवाब मलिक यांनी काय म्हटलं होतं?

हे वाचलं का?

‘समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार असं खुलं आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाणार आहे. तुझा तुरुंगावास निश्चित आहे. राज्यातील जनता पाहते आहे. वानखेडेची बोगसगिरी जगासमोर आणणार. समीर वानखेडेचा बाप बोगस होता, हा पण बोगस आहे.. याच्या घरातले सगळे बोगस आहेत. माझ्या जावयाला याने तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो, यात माझं काही नाही. माझ्यावर दबाव होता. तुझ्यावर दबाव टाकणाऱ्या तुझ्या बापाचं नाव सांग. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही’ असं म्हणत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंबाबत एकेरीवर येत टीका केली आहे.

समीर वानखेडेंनी काय उत्तर दिलं?

ADVERTISEMENT

माझ्यावर नवाब मलिक यांनी केलेले सगळे आरोप खोटे आहे. होय मी मालदिवला गेलो होतो. त्यासाठी मी रितसर सुट्टी घेतली होती. आत्ताच्या घडीला माझ्यावर, माझ्या बहिणीवर, माझ्या वडिलांवर वाट्टेल ते आरोप केले जात आहेत. मी माननीय मंत्री महोदयांना हे सांगू इच्छितो की आम्ही याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. असं उत्तर आता समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांना दिलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT