Narendra Modi यांच्या विरोधात शरद पवारच पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार -संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांनी आघाडी केली तर त्या आघाडीला नेतृत्व हवं. आत्तापर्यंत विरोधी पक्षांकडे चेहरा नाही. अशात पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या विरोधात शरद पवार हाच योग्य चेहरा आहे असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. जून महिन्यात शरद पवार यांच्या घरी काही संघटनांची बैठक पार पडली. तसंच काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घ्या असंही तेव्हा शरद पवार यांनी या सगळ्याच पक्षांना सांगितलं. आता सगळ्या पक्षांची मोट बांधायची असेल आणि त्याचं नेतृत्व जर कुणी करायचं असेल तर तो चेहरा शरद पवार यांचाच आहे असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवलं आहे.

ADVERTISEMENT

मागच्याच महिन्यात शरद पवार आणि रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याही भेटी झाल्या होत्या. त्यावरूनही विविध चर्चांना उधाण आलं होतं. तिसऱ्या आघाडीची चर्चाही रंगली होती. मात्र काँग्रेस काय किंवा शिवसेना काय यांना घेतल्याशिवाय तिसरी आघाडी होऊ शकत नाही असं मत खुद्द शरद पवार यांनीच व्यक्त केलं होतं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. या निवडणुका नमो Vs रागा अशा म्हणजेच नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल गांधी अशा लढल्या गेल्या. या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपद सोडलं. आता सोनिया गांधी अध्यक्ष आहेत आणि राहुल गांधी यांच्याकडे कोणतंही पद नाही. त्यामुळे आता 2024 च्या दृष्टीन तयारी सुरू झाली आहे.

विरोधकांची आघाडी मोदींच्या विरोधात उभी करायची असेल आणि भाजपला तसंच नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून जर कोणता चेहरा हवा असेल तर तो शरद पवार यांचा चेहरा आहे. तेच पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार ठरू शकतात असं आता संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आता असाच प्रयोग जर देशपातळीवर करायचा असेल तर त्यासाठीचा योग्य चेहरा शरद पवारच आहेत असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT