गुलामाप्रमाणे वागवलं जातंय! फिक्स पगार द्या, झोमॅटो बॉय आक्रमक
झोमॅटो कंपनीने डिलिव्हर बाईकवर जाचक अटी आणि नियम लागू केल्याच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी कंपनीचा निषेध नोंदवला आहे. पुढील एक आठवडा हाताला काळी रिबीन बांधून कंपनीचा निषेध नोंदवत झोमॅटो बॉय काम करणार आहेत. कोरोना काळात झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने आपला जीव धोक्यात घालून घरपोच सेवा दिल्या. त्यावेळी त्यांना कंपनीने वेतन आणि इंसेंटिव दिला. आता मात्र गरज सरो […]
ADVERTISEMENT
झोमॅटो कंपनीने डिलिव्हर बाईकवर जाचक अटी आणि नियम लागू केल्याच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी कंपनीचा निषेध नोंदवला आहे. पुढील एक आठवडा हाताला काळी रिबीन बांधून कंपनीचा निषेध नोंदवत झोमॅटो बॉय काम करणार आहेत.
ADVERTISEMENT
कोरोना काळात झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने आपला जीव धोक्यात घालून घरपोच सेवा दिल्या. त्यावेळी त्यांना कंपनीने वेतन आणि इंसेंटिव दिला. आता मात्र गरज सरो आणि वैद्य मरो या उक्तीप्रमाणे कंपनीने डिलिव्हरी बॉयवर जाचक अटी आणि नियम लागू केले आहेत.नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यांनी आता आपल्या कामाची वेळ कंपनीकडे नमूद करायची आहे. त्यानंतर त्यांना काम करता येणार आहे.
लग्न आहे की लॉकडाऊन?; विकी-करतरिनाच्या लग्नातील नियम पाहून तुम्हीही चक्रावून जाल
हे वाचलं का?
या जाचक अटी आणि नियमा विरोधात कर्मचाऱ्यांनी चार हुतात्मा पुतळ्याजवळ जमून कंपनीचा निषेध नोंदवला आहे.नियमाने बेसिक पगार मिळत नाही.आम्हाला गुलामासारखे राबवले जाते. अॅक्सिडेंटल इन्शुरन्स हा एक लाखाचा असून तो वाढवून द्यावा.या आणि अशा मागण्यासाठी एक आठवडा झोमॅटो बॉय हाताला काळी रेबिन बांधून कंपनीचा निषेध नोंदवत काम करणार आहेत.
ADVERTISEMENT
आम्हाला आठ दिवसांपासून आश्वासन दिली जात आहेत. मात्र आता आम्ही डिलिव्हरी करताना हाताला काळी फित बांधूनच जाणार आहोत. आम्हाला गुलामाप्रमाणे वागवू नका एवढीच आमची मागणी आहे. मात्र ती मागणीही कंपनीकडून मान्य केली जात नाहीये असं या झोमॅटो बॉयचं म्हणणं आहे. आम्ही दहा तास काम करून हातात फक्त दोनशे ते तीनशेच रूपये मिळतात. त्यातले १०० ते १५० रूपये हे पेट्रोलसाठी जातात. त्यामुळे उरतात फक्त 150 रूपये. त्यामुळे आमची ही प्रमुख मागणी आहे की आमचं जुनं रेटकार्ड सुरू करा आणि आम्हाला फिक्स पगार द्या. दहा तास काम करून हातात फक्त 150 रूपये उरणार असतील तर आम्ही आमचा चरितार्थ कसा चालवायचा असाही प्रश्न या आंदोलन करणाऱ्या झोमॅटो डिलिव्हिरी बॉईजनी विचारला आहे.
ADVERTISEMENT
आणखी काय म्हटलं आहे या सगळ्यांनी?
इंग्रज देशातून निघून गेले तरीही आम्हाला जी वागणूक दिली जाते आहे ती गुलामगिरीची वागणूक आहे. आम्हाला जे वेतन दिलं जातंय ते पुरेसं नाही. पूर्वीचं रेटकार्ड सुरू करा आणि फिक्स पगार द्या अशी आमची कंपनीकडे मागणी आहे. आम्हाला टाइम स्लॉट दिला जातो. त्यात जर ऑर्डर मिळाल्या नाहीत तर हताशपणे परतावं लागतं. अशात आम्ही काय करायचं? कसं जगायचं हा प्रश्न आमच्यापुढे आहे असंही एका झोमॅटो बॉयने स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT