चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, दोन जण ठार 15 ते 17 जण जखमी
चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल बस आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाल्याने दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर 15 ते 17 जण जखमी झाले आहेत. खासगी बस ट्रॅव्हल बस आणि ट्रक यांच्यात धडक झाली. नागपूरकडून चंद्रपूरकडे जाणारी भरधाव बस डिव्हायडर ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आली. त्याचवेळी चंद्रपूरकडून नागपूरला जणाऱ्या ट्रकने बसला जोरदार […]
ADVERTISEMENT

चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल बस आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाल्याने दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर 15 ते 17 जण जखमी झाले आहेत. खासगी बस ट्रॅव्हल बस आणि ट्रक यांच्यात धडक झाली. नागपूरकडून चंद्रपूरकडे जाणारी भरधाव बस डिव्हायडर ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आली. त्याचवेळी चंद्रपूरकडून नागपूरला जणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली.
या अपघातात बस आणि ट्रकच्या ड्रायव्हरचा मृतांमध्ये समावेश आहे. जखमींना बसमधून काढून वरोरा उपजिल्हा रूग्णालयात हलवण्यास सुरूवात झाली.