छत्तीसगढच्या दोन बहिणींची अकोल्यात धावत्या रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

धनंजय साबळे, प्रतिनिधी, अमरावती

ADVERTISEMENT

छत्तीसगडच्या दोन मुलींनी अकोल्यात धावत्या रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आहे अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मनारखेड़ रेल्वे चौकी परिसरातील. बुधवारी रात्री या दोन्ही मुलींनी मुंबई-कोलकाता रेल्वेतून पाठोपाठ उडी मारून आत्महत्या केली आहे. या दोघीही छत्तीसगड़ येथील रहिवासी असून रागाच्या भरात त्यांनी घर सोडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे . मात्र आत्महत्या का केली त्यामागचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. या संदर्भातला पुढील तपास अकोला पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील मनारखेड़ रेल्वे चौकी परिसरात १९ वर्षीय दोन मुलींचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आले. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. अकोल्यातील उरळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवून पुढील तपास सुरू केला. तपासा दरम्यान, दोनहि मुलींची ओळख पटली आहे. कुमारी बेबी राजपुत (वय १९, राहणार, चापा, जि. जांगिर, छत्तीसगड़) आणि कुमारी पूजा गिरी, (वय १९, राहणार, चापा, जि. जांगिर, छत्तीसगड़) अशी या मुलींची नावं आहेत.

हे वाचलं का?

या दोघी एकमेकींच्या मावस बहिणी आहेत. या दोन्ही मुलींनी चार दिवसांपूर्वी आयटीआय’ला जातो असे सांगून घर सोडलं. त्यानंतर त्या दोघी घरी परतल्याच नाहीत. त्यांची शोधाशोध केल्यानंतरही त्यांचा सुगावा लागला नाही. अखेर, त्यांच्या कुटुंबीयांनी चापा पोलिस स्टेशन गाठले बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान, या दोन्ही मुलींनी मुंबई-कलकत्ता रेल्वे’मध्ये प्रवासात आपली जीवनयात्रा संपवली. असे असले तरी प्रकरण नेमके काय आहे, हे पोलिस तपासाअंतीच समोर येणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंत वडतकर करीत आहे.

एकापाठोपाठ उडी मारून केली आत्महत्या !

ADVERTISEMENT

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-कोलकाता रेल्वे’मध्ये पूजा आणि बेबी हे प्रवास करीत असताना, दोघींनी रेल्वेतून पाठोपाठ उडी मारून आत्महत्या केली आहे. यावेळी दोन्ही मुली आयटीआयच्या गणवेशात असून आयटीआय’मध्ये कोपा’चं शिक्षण सुरु होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोपा’ची ऑनलाइन परीक्षा दिली. दरम्यांन, या दोन्ही मुलींच्या आत्महत्या नेमकं कारण अद्याप पर्यत कळू शकलेले नाही.

ADVERTISEMENT

दोघीही मावस बहिणी

कुमारी बेबी राजपुत आणि कुमारी पूजा गिरी हे दोघेही मावस बहिणी आहेत. त्यांनी नैराश्येच्या भरात हे पाऊल उचलल्याने अख्ख कुटुंब उध्वस्त झालं आहे. दरम्यांन, हा प्रकार घडल्याने छत्तीसगड भागातील चापा गावात शोककळा पसरली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT