किरण गोसावीला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं लखनऊला रवाना

मुंबई तक

किरण गोसावीला अटक कऱण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं लखनऊला रवाना झाली आहेत. किरण गोसावी हा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातला पंच आहे. तो इतके दिवस गायब होता. प्रभाकर हा रविवारी समोर आल्यानंतर किरण गोसावीनेही फोनवरून प्रतिक्रिय दिली आहे. त्यानंतर आता किरण गोसावीला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं लखनऊ या ठिकाणी त्याला अटक करण्यासाठी गेली आहेत. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

किरण गोसावीला अटक कऱण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं लखनऊला रवाना झाली आहेत. किरण गोसावी हा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातला पंच आहे. तो इतके दिवस गायब होता. प्रभाकर हा रविवारी समोर आल्यानंतर किरण गोसावीनेही फोनवरून प्रतिक्रिय दिली आहे. त्यानंतर आता किरण गोसावीला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं लखनऊ या ठिकाणी त्याला अटक करण्यासाठी गेली आहेत. किरण गोसावीचं शेवटचं मोबाईल लोकेशन हे उत्तर प्रदेशातील फतेहपूर या ठिकाणी होतं हेदेखील पोलिसांनी कन्फर्म केलं आहे.

काय म्हणाला किरण गोसावी?

सहा तारखेपर्यंत मी मुंबईत होतो. त्यानंतर मला मोठ्या प्रमाणावर धमक्यांचे फोन येऊ लागले. मला ठार करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे मी नाईलाजाने फोन बंद केला. 6 ऑक्टोबरला ही केस पूर्णपणे ओपन झाली त्यावेळी मला हे समजलं की माझ्याविरोधात जी फसवणुकीची केस आहे ती पण ओपन झाली आहे. त्यासंदर्भात जेव्हा मी पुण्याला जात होतो त्यावेळीही मला फोन आला. फोनवर हे सांगण्यात आलं की तुला अरेस्ट होणार आहे आणि त्यानंतर तुला कुणीही वाचवणार नाही. तुला कुणीही सोडणार नाही. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की पुण्यात जाऊन सरेंडर करण्यात काही अर्थ नाही. त्यानंतर माझा जीव वाचावा म्हणून मी राज्याबाहेर गेलो. जे काही मी लिहून दिलं आहे त्या सगळ्या गोष्टी मी कोर्टात बोलेन.