Kirit Somaiya: उद्धव ठाकरेंनी आता त्यांच्या मुलाची काळजी घ्यावी, कारण लवकरच…

मुंबई तक

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी पुण्यातल्या मानाचा कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी आरतीही केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. राज्यावरचं अमंगळ सरकार गेलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राचं जीवन मंगलमय करणार आहेत असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. तसंच उद्धव ठाकरेंनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी पुण्यातल्या मानाचा कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी आरतीही केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. राज्यावरचं अमंगळ सरकार गेलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राचं जीवन मंगलमय करणार आहेत असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. तसंच उद्धव ठाकरेंनी आता त्यांच्या मुलाची काळजी घ्यावी असाही सल्ला त्यांनी दिला आहे.

भ्रष्टाचाराचं स्मारक तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातात हातोडा दिला : किरीट सोमय्या

नेमकं काय म्हणाले आहेत किरीट सोमय्या?

उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारला जनतेने कायमचं रवाना केलं आहे. त्यांचा उजवा हात तर जेलमध्ये गेला आहे असं म्हणत त्यांनी नाव न घेता संजय राऊत यांच्यावर टीका केली. तसंच तुमचा डावा हातही आता तुरुंगात जाणार आहे. तुम्ही आता तुमच्या मुलाची म्हणजेच आदित्य ठाकरेंची काळजी घ्या असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांनी एक प्रकारे हा खोचक सल्लाच दिला आहे.

ED: किरीट सोमय्या अगदी ठामपणे म्हणाले.., ‘अनिल परबला अटक होणारच!’