Vaccine Shortage वर नितीन गडकरींनी सुचवला मार्ग, म्हणाले..

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Vaccine Shortage अर्थात देशातल्या लस तुटवड्यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मार्ग सुचवला आहे. देशातल्या कोरोना रूग्णवाढीचा वेग मंदावला आहे. तरीही मृतांची संख्या वाढते आहे. अशात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लस हे प्रभावी माध्यम ठरतं आहे. मात्र महाराष्ट्रासह देशभरात लसींचा मोठ्य़ा प्रमाणावर तुटवडा भासतो आहे. त्यासाठी आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मार्ग सुचवला आहे.

ADVERTISEMENT

18 ते 44 वयोगटातील लोकांचं लसीकरण थांबलं, याला जबाबदार कोण?

काय म्हणाले आहेत नितीन गडकरी?

हे वाचलं का?

ANI शी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की जर लसींची मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे तर त्यामुळे समस्या उद्भवते. जी आत्ता उद्भवली आहे. त्यामुळे एकाच कंपनीला लस तयार करण्याऐवजी 10 कंपन्यांना लस तयार करण्याचा परवाना द्या. त्या कंपन्यांना देशात आवश्यकतेनुसार पुरवठा करू द्या. समजा लस निर्मिती जास्त झाली देशाला पुरून लसी उरल्या तर त्या निर्यात करण्यासाठी संमती द्या. प्रत्येक राज्यात दोन-तीन लॅब आहेत. त्यांनी ही लस निर्मिती सेवा म्हणून तर 10 टक्के रॉयल्टी घेऊन करावी. यासंबंधीच्या कागदपत्रांची पूर्तता 15 ते 20 दिवसांमध्ये करता येईल. औषधाचं पेटंट असलेल्यांना आणखी काही औषध कंपन्यांद्वारे 10 टक्के रॉयल्टी देण्याची व्यवस्था करण्यात यावी असंही गडकरींनी सुचवलं आहे.

Maharashtra Vaccination: लसीकरण कधीपर्यंत सुरळीत होणार?, महाराष्ट्रातील जनतेचा सवाल!

ADVERTISEMENT

आणखी काय म्हणाले नितीन गडकरी?

ADVERTISEMENT

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांच्या अंत्यसंस्काराबाबतही काही गोष्टी त्यांनी सुचवल्या. कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्या व्यक्तींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत डिझेल, इथेनॉल, बायोगॅस आणि वीज यांचा वापर केला तर अंत्यसंस्कारांसाठीचा खर्च कमी होईल. बिहार आणि उत्तर प्रदेशात अंत्यसंस्कारांसाठी जास्त पैसे द्यावे लागतात त्यामुळे मृतदेह गंगेत सोडण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावरून संपूर्ण देशभरातून अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि टीकाही झाली. या संबंधी आलेल्या तक्रारींच्या नंतर नितीन गडकरींनी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मांडला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT