Nitin Gadkari : चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो काढा, ५०० रूपये मिळवा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने गाडी पार्क केली असेल तर तो फोटो पाठवा आणि ५०० रूपये मिळवा ही महत्त्वाची घोषणा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यासाठी लवकरच कायदा आणला जाणार आहे असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं. दिल्लीतल्या इंडस्ट्रीयल डीकार्बनायझेशन समिट (Industrial Decarbonization Summit 2022-IDS-2022) या कार्यक्रमात नितीन गडकरींनी हे वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

“पेट्रोल, डिझेल संपणार… आता आपल्याला” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं महत्त्वाचं वक्तव्य

आपल्या देशातल्या अनेक शहरांना लोकांमध्ये कार पार्किंगबाबत शिस्त नाही. अनेक भागांमध्ये व्यवस्थित मार्किंग केलेलं असतं तरीही लोक शिस्त न पाळता हवी तशी कार पार्क करतात हे दिसून आलं आहे. मोकळी जागा मिळाली की करा पार्किंग असा लोकांचा कल दिसतो. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होते. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कायदा आणण्यासाठी आमचा विचार सुरू आहे असंही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

हायड्रोजन कार घेऊन थेट संसदेत पोहचले नितीन गडकरी , म्हणाले…’ही कार….’

नितीन गडकरी यांनी यावेळी हेदेखील सांगितलं की मी एक कायदा करणार आहे. जो कुणी व्यक्ती चुकीच्या पद्धतीने पार्किंग करेल त्याला १००० रूपये दंड आकारण्यात येईल. त्याचवेळी त्या गाडीचा फोटो काढून पाठवणाऱ्याला ५०० रूपये बक्षीस देण्यात येतील. माझ्या आचाऱ्याकडे दोन सेकंडहँड गाड्या आहेत. चार लोकांच्या कुटुंबाकडे सहा कार आहेत. त्या तुलनेत दिल्लीतले नागरिक सुखी आहेत असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

आणखी काय म्हणाले आहेत नितीन गडकरी?

ADVERTISEMENT

अनेक लोक आपल्या पार्किंगची सोय करत नाहीत त्याऐवजी कार रस्त्यावर उभी करतात. कार पार्किंगची योग्य ती शिस्त पाळत नाहीत, असंही नितीन गडकरींनी म्हटलंय. केंद्र सरकारने हा कायदा लागू केल्यानंतर रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असंही नितीन गडकरींनी म्हटलंय.

नितीन गडकरी यांनी केलेली घोषणा महत्त्वाची असल्याचं लोकांनी म्हटलंय. हा कायदा लागू झाल्यानंतर जे लोक चुकीच्या पद्धतीने कार पार्क करणाऱ्या लोकांना १ हजार रूपयांचा दंड भरावा लागेल. तसंच जे लोक या कारचा फोटो पाठवतील त्यांना ५०० रूपये बक्षीस दिलं जाणार आहे

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT