वाशिम : अवकाळी पावसाचा फटका, सिव्हील हॉस्पिटलच्या वॉर्डांमध्ये पाणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात आज तौकताई वादळाचं संकट ओढावलं. कोकण किनारपट्टीसह अनेक भागांना या वादळाचा फटका बसला आहे. वाशिममध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे सिव्हील हॉस्पिटलच्या वॉर्डात पाणी शिरलं आहे.

ADVERTISEMENT

कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचार सुरु असणाऱ्या वॉर्डांमध्येही पावसाचं पाणी शिरल्यामुळे प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीचं पितळ उघडं पडलं आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांना या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला. या पावसाचं पाणी ICU वॉर्डात शिरल्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.

हे वाचलं का?

Cyclone Tauktae : मुंबई, कोकणात उद्या मुसळधार पावसाचा IMD चा अंदाज

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT