राज ठाकरेंचा आदेश यूपीवाल्यांनीही मानला, अजानच्या वेळी लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावला!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वाराणसी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसापासून कट्टर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला असून यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. जिथे-जिथे अजानचे भोंगे सुरु असतील तिथे हनुमान चालीसा लावायचा असे आदेशच राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत. आता राज ठाकरेंचा हाच आदेश थेट उत्तर प्रदेशात म्हणजेच यूपीमध्येही अंमलात आणला गेलाय.

ADVERTISEMENT

काही वर्षांपूर्वी ज्या यूपीच्या नागरिकांना राज ठाकरे हे त्यांच्या परप्रांतीयांच्या भूमिकेमुळे व्हिलन वाटत होते तेच राज ठाकरे आता कट्टर हिंदूत्वाच्या मुद्द्यामुळे त्यांना हिरो वाटू लगाले आहेत. कारण राज ठाकरे यांनी जी भोंग्याबाबतची भूमिका घेतली आहे त्याबाबत आता उत्तर प्रदेशात अंमलबजावणी सुरु झाली आहे.

महाराष्ट्रात लाऊडस्पीकरवरून हनुमान चालीसा लावा असे आदेश राज ठाकरेंनी दिलेले आहेत. असं असताना थेट वाराणसीमध्ये श्रीकाशी विश्वनाथ ज्ञानवापी मुक्ती आंदोलनाने लाऊडस्पीकर लावले आहेत. जिथे अजानच्या वेळी मोठ्या आवाजात हनुमान चालिसाचे पठण केले जात आहे. हे लाऊडस्पीकर घरांच्या छतावर लावण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

वाराणसीच्या साकेत नगर भागातील आंदोलनाचे अध्यक्ष सुधीर सिंह यांनी आपल्या घरापासून याची सुरुवात केली आहे. त्यांनी सांगितले की, अजानच्या वेळी हनुमान चालीसा लाऊडस्पीकरद्वारे त्याच प्रकारे वाजवली जाईल. यावेळी ते असंही म्हणाले की, हिंदू-मुस्लिम सलोखा बिघडवणे हा आमचा उद्देश नाही.

ADVERTISEMENT

आपल्या घरातून लाऊडस्पीकरद्वारे हनुमान चालिसाचे पठण सुरू करणारे श्री काशी विश्वनाथ ज्ञानवापी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष सुधीर सिंह यांनी असंही सांगितलं की, काशीमध्ये पहाटेपासूनच वेद पठण होत असे. तसेच पूजा-पाठ आणि हनुमान चालीसाचे पठण देखील होत असे. पण दबावामुळे या सर्व गोष्टी बंद झाल्या होत्या.

ADVERTISEMENT

‘3 तारखेला ईद.. तोवर मशिदीवरील भोंगे उतरवा, नाहीतर…’, राज ठाकरेंचा थेट अल्टिमेटम

सुधीर सिंह म्हणाले की, ‘कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही आमच्या मंदिरातील लाऊडस्पीकर काढून टाकले, परंतु मशिदींवरील लाऊडस्पीकर कायम राहिले, सकाळी साडेचार वाजेपासूनच आम्हाला अजानचा आवाज येऊ लागतो.’

सुधीर सिंह पुढे म्हणाले की, ‘आम्ही ठरवले आहे की, जेव्हा अजानचा आवाज येत असेल, तर तेव्हा आम्ही आमच्या मंदिरांतून आम्ही लाऊडस्पीकरवर वैदिक मंत्र आणि हनुमान चालिसाचे पठण का करू नये? त्यामुळे अजान सुरू होताच आम्ही लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवू लागलो.’

राज ठाकरे पुन्हा म्हणाले… ‘मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार!’

‘अजानच्या आवाजाबाबत यापूर्वीही आक्षेप नोंदवण्यात आला होता की, अजानचा आवाज कमी करावा, जेणेकरून आम्हाला त्याच्या आवाजाचा त्रास होणार नाही. आता आम्ही चार ते पाच वेळा लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचे पठण करत आहोत. परंतु नियमानुसार हनुमान चालीसा फक्त सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी म्हटलं जातं. त्यामुळे पुढे जाऊन दोन वेळेसच हनुमान चालिसाचे पठण केले जाईल.’ असंही सुधीर सिंह म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT