Vaccination for All : सप्टेंबरपासून देशात २ वर्षांवरील मुलांना कोरोनाची लस मिळण्याचे संकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाविरुद्ध लसीकरण मोहीमेत भारत आणखी एक पाऊल पुढे टाकण्याच्या तयारीत आहे. येत्या सप्टेंबरपासून भारतात दोन वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाला सुरवात होण्याची शक्यता आहे. AIIMS रुग्णालयाचे संचालक आणि केंद्र सरकारच्या टास्क फोर्समधील महत्वाचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी India Today शी बोलताना ही माहिती दिली.

ADVERTISEMENT

समजून घ्या : Delta+ Variant नेमका आहे तरी काय? महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण कोणत्या जिल्ह्यात?

भारतात चार ठिकाणी लहान मुलांवर कोरोना लसीच्या क्लिनीकल ट्रायलला सुरुवात झालेली आहे. या ट्रायलचा डेटा सप्टेंबर महिन्यांपर्यंत हाती येईळ, त्याचदरम्यान २ वर्षांवरील मुलांसाठी कोवॅक्सिन लसीचा डोस देण्याची परवानगी मिळू शकते अशी माहिती गुलेरिया यांनी दिली. Pfizer-BioNTech च्या लसीला हिरवा कंदील मिळाला तर ही लस देखील लहान मुलांसाठी एक चांगला पर्याय ठरु शकते अशी माहिती गुलेरियांनी यांनी दिली.

हे वाचलं का?

Delta Plus: लस आणि प्रतिकारशक्ती या दोन्हीला चकमा देऊ शकतो कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट: तज्ज्ञ

दिल्लीच्या एम्स रुग्णालयात २ ते १७ वयोगटातील मुलांवर लसीच्या क्लिनीकल ट्रायल्स सुरु आहेत. १२ मे रोजी DGCI ने भारत बायोटेकला लहान मुलांवर कोवॅक्सिन लसीच्या क्लिनीकल ट्रायलला परवानगी दिली होती. सध्या कोरोनामुळे देशभरात शाळा आणि कॉलेज बंद आहेत. अशावेळी शाळा कधी सुरु करता येईल असं विचारलं असता, यापुढे धोरण आखताना शाळांच्या माध्यमातून पुन्हा विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही असं धोरण आखून मगच याबद्दल विचार करता येऊ शकतो.

ADVERTISEMENT

‘Covishield लसीच्या दोन डोसमधील अंतर बदलण्याची गरज नाही’

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT