वसुली अधिकाऱ्यानेच मारला लॉकरमधील तब्बल 114 तोळे सोन्यावर डल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्मिता शिंदे,जुन्नर: जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील वैष्णवी मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या लॉकरमध्ये नागरिकांनी तारण ठेवलेल्या 51 लाख 21 हजार रुपये किंमतीच्या 114 तोळे सोन्यावर सोसायटीच्याच वसुली अधिकाऱ्याने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विकास शांताराम खिलारी (वय 41 वर्ष) असे कर्मचाऱ्याचे नाव असून आळेफाटा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहे.

ADVERTISEMENT

सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून सोने गायब केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यातील 51 तोळे सोने बेल्हे येथील पांडवकालीन विहिरीत दडवले होते ते पोलिसांनी हस्तगत केले आहे. तर उर्वरीत 63 तोळे नारायणगाव येथील खाजगी फायनान्स कंपनीत तारण ठेवलं आहे.

याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बेल्हे येथील वैष्णवी मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे वसुली अधिकारी व क्लार्कचे काम करणारा कर्मचारी विकास शांताराम खिल्लारी रा. बेल्हे याने सीसीटीव्ही डीव्हीआर बंद करून ही चोरी केली होती.

हे वाचलं का?

सोसायटीच्या लॉकरमध्ये तारण ठेवलेले अक्षय वसंत जगताप यांचे 27 तोळे 780 मिली ग्रॅम, महेंद्र बबन जगताप यांचे 5 तोळे 448 मिली ग्रॅम, हारून बाबुभाई बेपारी यांचे 5 तोळे ९९८ मिली ग्रॅम, राहुल वसंत जगताप यांचे 4 तोळे 500 मिली ग्रॅम, जाफर अहमद पठाण यांचे 11 तोळे 240 मिली ग्रॅम, हारून बाबू भाई बेपारी यांचे 15 तोळे 599 मिली ग्रॅम, सद्दाम रफिक बेपारी यांचे 8 तोळे 815 मिली ग्रॅम, सुनंदा नामदेव नलावडे यांचे 14 तोळे 34 मिली व 11 तोळे 104 ग्रॅम वजनाचे सोने दागिने असे एकूण 51 लाख 21 हजार रुपये किंमतीचे 114 तोळे सोने चोरून नेले होते.

शाखाव्यवस्थापक विनोद दत्तात्रेय महाडिक यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वसुली अधिकारी विकास खिलारी याच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

ADVERTISEMENT

आळेफाटा पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पुढील तपास करत असून वसुली अधिकाऱ्यांकडे लॉकरच्या आल्या कश्या त्याला अजून कोणी साथीदार आहे याचा शोध घेतला जात आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT