school fees : पालकांनी फी कपातीसंदर्भात तक्रार कुठे करायची? शिक्षणमंत्र्यांनी दिलं उत्तर
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच शाळांच्या शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला असून, जीआरही (शासन आदेश) काढण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आणि पालकांनी शुल्क कपातीबद्दल शाळांची तक्रार कुठे करायची असे प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाष्य केलं आहे. करोना काळात शाळा बंद असल्यानं शुल्कात कपात […]
ADVERTISEMENT

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच शाळांच्या शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला असून, जीआरही (शासन आदेश) काढण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आणि पालकांनी शुल्क कपातीबद्दल शाळांची तक्रार कुठे करायची असे प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाष्य केलं आहे.
करोना काळात शाळा बंद असल्यानं शुल्कात कपात करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. तसे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य सरकारनंही या आदेशाची राज्यात अंमलबजावणी केली आहे. राज्य सरकारने तसा आदेशही काढला आहे. मात्र याबद्दल वेगवेगळ्या शंका पालकांकडून उपस्थित केल्या जात आहे.
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना अगोदरच सांगितलं आहे. जीआर (शासन आदेश) काढण्यात आलेला आहे. त्यामाध्यमातूनच याची अंमलबजावणी केली जाईल. १५ टक्के शुल्क कपातीसंदर्भात शाळेबद्दल ज्यांची तक्रार असेल, यासंदर्भात तक्रार निवारण समित्या आहेत. या समित्यांकडे तक्रार करता येईल’, अशी माहिती शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिली.
‘विभागीय डीएफआर स्थापन करण्यात आले आहेत. याच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत. त्यांच्याकडेही पालक दाद मागू शकतात. त्या जीआरमध्येही स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे’, वर्षा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
