ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन, वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं आज वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं आहे, हृदयविकाराच्या झटक्यामुळे रमेश देव यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून मिळाली आहे.

ADVERTISEMENT

रमेश देव आणि त्यांच्या पत्नी सीमा देव यांची जोडी पडद्यावर आणि पडद्याच्या बाहेर चांगलीच गाजली. या दोघांनीही मराठी चित्रपट सृष्टीला काही सदाबहार चित्रपट दिले. १९६२ मध्ये त्यांनी वरदक्षिणा या चित्रपटात सोबत काम केले. या चित्रपटावेळीच दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं, ज्यानंतर रमेश देव आणि सीमा देव विवाहबंधनात अडकले.

वयाची नव्वदी ओलांडल्यानंतरही आपल्या उत्साहासाठी रमेश देव कायम ओळखले जायचे. २०१३ साली रमेश देव आणि सीमा देव यांच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झाली होती. काही दिवसांपूर्वीच रमेश देव यांनी आपला ९३ वा वाढदिवस साजरा केला होता. मराठी चित्रपटांसोबत बॉलिवूडमध्येही रमेश देव यांनी आपलं नाव मोठं केलं. प्रसिद्ध अभिनेता अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनव देव ही त्यांची मुलही चित्रपट सृष्टी गाजवत आहेत.

हे वाचलं का?

अभिनेता म्हणून अशी राहिली आहे रमेश देव यांची कारकिर्द –

स्वतःला केवळ चित्रपटांमध्ये अडकवून न घेता रमेश देव यांनी मराठी नाटक, हिंदी सिनेमा ते जाहीराती असा मोठा पल्ला आपल्या कारकिर्दीत गाठला होता. २८५ हिंदी सिनेमे, १९० मराठी सिनेमे, ३० नाटकांचे जवळपास २०० प्रयोग रमेश देव यांनी केले. याव्यतिरीक्त विविध ब्रँडच्या २५० जाहीराती आणि छोट्या पडद्यावरील काही मालिकांमध्येही ते दिसले. अभिनेता, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिकांमध्ये रमेश देव यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं होतं. त्यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीचं मोठं नुकसान झाल्याचं बोललं जातंय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT