ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्लेंचं निधन, ‘रक्त आणि पाऊस’ सारखी अभिजात साहित्यकृती लिहिणारी लेखणी शांत
ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचं पुण्यात निधन झालं. ते पुण्यात दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचारासाठी दाखल होते. उपचारादरम्यानच आज त्यांचे निधन झाले . ते ७४ वर्षांचे होते. १९६० नंतरच्या काळातील महत्त्वाचे मराठी साहित्यिक. कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मयप्रकारांत दर्जेदार वाङ्मयनिर्मिती करणार्या नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी […]
ADVERTISEMENT

ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचं पुण्यात निधन झालं. ते पुण्यात दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचारासाठी दाखल होते. उपचारादरम्यानच आज त्यांचे निधन झाले . ते ७४ वर्षांचे होते.
१९६० नंतरच्या काळातील महत्त्वाचे मराठी साहित्यिक. कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मयप्रकारांत दर्जेदार वाङ्मयनिर्मिती करणार्या नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी झाला. महाविद्यालयीन शिक्षण देगलूर येथे झाले. पदव्युत्तर शिक्षण मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, येथे झाले. बी.ए. आणि एम.ए. या दोन्ही परीक्षांत विद्यापीठात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यासाठी अनुक्रमे डॉ.नांदापूरकर आणि कवीवर्य मायदेव हे प्रतिष्ठाप्राप्त पुरस्कार मिळाले. एम.ए (मराठी) परीक्षेत ते विद्यापीठात सर्वप्रथम आले. कुलपतींच्या सुवर्णपदकाने सन्मानित झाले.. ‘शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध लिहून त्यांनी १९८० साली पीएच.डी. पदवी संपादन केली.
१९७१ ते १९७७ या काळात बीड येथील महाविद्यालयात मराठीचे अधिव्याख्याता म्हणून काम केल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रथम अधिव्याख्याता आणि नंतर प्रपाठक या पदांवर १९७७ ते १९९६ या काळात काम केले. १९९६ ते २००५ या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम केले. २००५ सालापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. व्यासंगी, अध्यापनकुशल, उपक्रमशील आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक आणि पुणे विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक या पदांवरून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.