रघुनाथ कुचिक प्रकरणात ट्विस्ट: चित्राताईंच्या माणसांनी माझं अपहरण केलं– पीडितेचा गंभीर आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यातील शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर शारिरिक अत्याचार आणि गर्भपात करायला भाग लावल्याचा आरोप करणाऱ्या पीडित मुलीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले आहेत. या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्यात येत असून चित्रा वाघ यांच्याकडून माझ्यावर दडपण टाकलं जात असल्याचं या पीडित मुलीने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

रघुनाथ कुचिक आणि माझ्यात जो काही वाद आहे त्यातला काही गोष्टी खऱ्यात घडलेल्या आहेत पण नंतर या प्रकरणाला राजकीय वळण लावण्यात आल्याचं या पीडित तरुणीने मुंबई तक शी बोलताना सांगितलं.

“मी चित्रा वाघ यांच्याकडे मदत मागायला गेले नव्हते. रोहित भिसे आणि एका काकांनी माझी त्यांच्याशी ओळख करुन दिली. माझ्यात आणि कुचिक यांच्यात फोनवरुन जे काही संभाषण झालं त्यातले Chats त्यांनी चित्राताईंना दिले. परंतू यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असे काही Chats समोर आणले की जे संभाषण आमच्यात झालंच नव्हतं. आता त्यांनी कोणत्या यंत्रणेचा वापर करुन हे Chats तयार केले हे मला माहिती नाही.”

हे वाचलं का?

माझा गर्भपात सुरु असताना रोहित भिसे आणि मोहम्मद अंकल हे सर्व माहिती चित्राताईंना पुरवत होते. मला जेव्हा ही बाब समजली तेव्हा मला राग आला आणि मी रोहित भिसेला भेटले. जर तुम्ही गोष्टी चुकीच्या पद्धतीने समोर आणत असाल तर ते थांबलं पाहिजे असं मी त्यांना सांगितल्याचं पीडित मुलीने सांगितलं.

यावेळी बोलत असताना पीडित तरुणीने चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले. चित्राताई वाघ मला कायम चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडत होत्या. पोलिसांमध्ये जाऊन काय जबाब द्यायचा हे देखील त्याच सांगायच्या. मी त्यांना नेहमी सांगायचे की असं नको करुया कारण माझा वाद कुचिक यांच्याशी असला तरीही चुकीच्या गोष्टींसाठी त्यांच्यावर कारवाई व्हावी असं मला वाटत नाही. वारंवार विनंती करुनही चित्राताईंनी माझं ऐकलं नाही असंही या पीडित मुलीने सांगितलं.

ADVERTISEMENT

मध्यंतरी आपलं अपहरण झाल्याचा आरोप या पीडित तरुणीने केला होता. आपलं अपहरण हे चित्रा वाघ यांच्या मागणसांनी केल्याचा गंभीर आरोप या तरुणीने केला. ज्यावेळी माझं अपहरण करुन स्विफ्ट गाडीतून मला घेऊन जात होते, त्यावेळी घाटात मला जाग आली. त्यावेळी गाडीत चित्राताईंसोबत कायम असणारे पवार नावाचे एक व्यक्ती होते. त्या माणसांनी मला इंजेक्शन दिल्यामुळे मी वारंवार झोपून होते. त्या गाडीत असणारी लोकं हे नेहमी चित्राताईंसोबत वावरतात. पोलिसांनी जर भाजपच्या कार्यालयाचं फुटेज चेक केलं तरीही त्यांना ही गोष्ट समजेल असं या तरुणीने सांगितलं.

ADVERTISEMENT

आपलं अपहरण केलं तेव्हा मी मी त्या माणसांना विरोध केला, परंतू प्रत्येक वेळी त्यांनी मला इंजेक्शन देऊन झोपवून ठेवलं. या काळात माझ्यावर आणि माझ्या परिवारावर प्रचंड दडपण होतं. माझ्या परिवारासोबत कुचिकांनाही आम्ही मारुन टाकू अशी धमकी मला चित्राताईंची माणसं देत होती.

माझा वापर करुन ह्या व्यक्ती कुचिक यांच्याकडून पैसे, फ्लॅट वसूल करण्याच्या प्रयत्नात होते. मध्यंतरी कुचिक यांना जामिन मिळाल्यानंतर चित्राताई वारंवार चिडचिड करत होत्या. मी त्यांच्याकडे मदत मागितली आहे, मला कोणीच मदत करत नाही असं भासवणारे मेसेज मला कर असंही चित्राताईंनी मला सांगितल्याचं या पीडित तरुणीने सांगितलं. आता ही बाब मी समोर आणल्यानंतर माझा घातपात होऊ शकतो अशी भीती या तरुणीने व्यक्त केली आहे.

दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या आरोपांना उत्तर देत आपण चौकशीला तयार असल्याचं सांगितलं. फेब्रुवारी महिन्यापासून एकटीने लढणाऱ्या या मुलीच्या मी सोबत होते तेव्हा तिच्या मदतीला कोणीही नव्हतं. आज माझ्या विरोधात सर्व एकत्र आले याचा आनंद वाटला असं वाघ यांनी म्हटलं आहे.

पीडित तरुणीने काही दिवसांपूर्वी आपल्या फेसबूक प्रोफाईलवर आत्महत्या करत असल्याचा एक व्हिडीओ टाकला होता. परंतू पुणे पोलिसांनी यात वेळेतेच मध्यस्थी करुन तिला अनुचित पाऊल उचलण्यापासून थांबवलं. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT