Vidhan Sabha Live : यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे ! अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आहे. मराठा आरक्षण, ओबीसींचं राजकीय आरक्षण आणि राज्यातील नेत्यांची ईडी चौकशी हे मुद्दे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच गाजत आहेत. अशातच कोरोनाचं कारण देऊन सरकारने अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचा ठेवल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. त्यातच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद रद्द केल्यामुळे विरोधकांच्या हाती आयतच कोलित मिळालं आहे.

ADVERTISEMENT

भाजप आमदार अतुल भातळखकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत, १७० आमदार पाठीशी असून इतकेही बळ नसेल तर उपयोग काय? यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे असं ट्विट केलं आहे.

दरम्यान या दोन दिवसीय अधिवेशनासाठीही विरोधकांनी आपली रणनिती निश्चीत केली आहे. मंत्र्यांचे कथित भ्रष्टाचार, मराठा आणि ओबीसींचे आरक्षण, लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थीची होणारी कोंडी आदी विषयांवर जाब विचारणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. विरोधकांकडून आक्रमक भूमिका घेतली जाईल या भीतीनेच सत्ताधाऱ्यांनी केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेतल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.

हे वाचलं का?

शिवसेना आणि भाजप यांची पुन्हा युती होणार का? देवेंद्र फडणवीस म्हणतात…

दुसरीकडे, केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांबद्दल नापसंती, इतर मागासवर्गीय समाजाची (ओबीसी) सांख्यिकी माहिती मिळावी आणि मराठा आरक्षणासाठी घटनात्मक प्रक्रिया पार पाडावी, यासाठी आज, सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी ठराव मांडून केंद्रातील भाजप सरकारविरोधात भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

ADVERTISEMENT

Monsoon Session 2021 : विरोधी पक्षाच्या उद्योगांचीही भांडाफोड होणं गरजेचं,शिवसेनेचा भाजपवर निशाणा

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT