आर्वी गर्भपात प्रकरण : डॉक्टरच्या घरात सापडली तब्बल 97 लाखांची रोख रक्कम
वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील गर्भपात प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. बडतर्फ केलेल्या डॉ. नीरज कदम याच्या घराची झडती घेतली असता एका खोलीत 97 लाखांची रक्कम आढळली आहे. आर्वी येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. या प्रकरणात पोलिसांनी तपास करत डॉ. रेखा कदम सह एकूण सहा लोकांना अटक केली आहे. याच प्रकरणाचा […]
ADVERTISEMENT
वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील गर्भपात प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. बडतर्फ केलेल्या डॉ. नीरज कदम याच्या घराची झडती घेतली असता एका खोलीत 97 लाखांची रक्कम आढळली आहे. आर्वी येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. या प्रकरणात पोलिसांनी तपास करत डॉ. रेखा कदम सह एकूण सहा लोकांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
याच प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी कदम याच्या रुग्णालयाच्या आवारात असलेल्या घरात तपासणी केली होती. मात्र त्यावेळेस डॉक्टर नीरज कदम यांच्या आई डॉ. शैलजा कदम यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने शैलजा कदम यांना नागपूर येथे रुग्णलयात दाखल करण्यात आले होते.
शैलजा यांच्यासोबत नीरज कदम याचे वडील कुमारसिंग कदम हे सुद्धा रुग्णालयात असल्याने एका खोलीला लॉक होते. त्याच्या चाव्या या कुमारसिंगकडे असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे पोलिसानी ती खोली सील केली होती. शनिवारी कदम कुटुंबीयाकडून त्या खोलीची चावी पोलिसांना सुपूर्द केली असता पोलिसांनी खोली उघडून पोलिसांनी तपासणी केली असता तब्बल 97 लाखांचे घबाड हाती लागले. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली असून अधिक तपास सुरू आहे.
हे वाचलं का?
डॉक्टर कदम अखेर बडतर्फ
अटकेत असलेला डॉ. नीरज कदम हा कंत्राटी डॉक्टर म्हणून आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयात जानेवारी 2018 पासून स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत होता. त्याला 50 हजार रुपये मानधन तत्वावर मिळत होते. मात्र, शासकीय औषधसाठा त्याच्या खासगी रुग्णालयात आढळून आल्याचा अहवाल टास्कफोर्स चमूने सादर केल्याने तसंच डॉ. नीरज कदम याच्याविरुद्ध पोक्सो कलमान्वये गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याने त्यांची सेवा तत्काळ समाप्त करुन त्यांना बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओम्बसे यांनी दिले आहे. दुसरीकडे या प्रकरणात बायोमेडिकल वेस्टची योग्य विल्हेवाट न लावल्याची आर्वी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विजय देवळीकर यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी नागपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी कदम रुग्णालयाच्या संचालकाला नोटीस देत तात्काळ खुलासा मागविला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. मुलीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने तिचे आई वडील तिला डॉक्टरकडे घेऊन गेले असता ही बाब उघडकीस आली.
मुलगी गरोदर असल्याचे कळताच अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या आई वडिलांनी मुलीच्या आई वडिलांना गर्भपात करण्यास सांगितले. तसेच याची पोलिसांकडे वाच्यता केल्यास सर्व गावात बदनामी करु असे धमकावले. मुलगी केवळ 13 वर्षाची असून मुलीची आणि आपली बदनामी होऊ नये म्हणून मुलीच्या आई वडिलांनीही त्यांचे म्हणणे ऐकले. त्यानुसार स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रेखा कदम यांच्या दवाखान्यात मुलीचा बेकायदेशीररित्या गर्भपात करण्यात आला. यासाठी मुलाच्या घरच्यांनी 30 हजार रुपये दिले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT