मुंबईत Water Logging होणारच नाही असा दावा केलाच नव्हता-महापौर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत पाणी साचणार नाही असा दावा कधीही केला नव्हता. चार तासांच्या आत पाण्याचा निचरा झाला नाही तर नालेसफाईचं काम चांगलं झालं नाही हे मान्य करावं लागेल असा दावा आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी त्यांनी काही वेळापूर्वी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आज एकाच वेळी मुंबईत हायटाईड, मुसळधार पाऊस यामुळे हिंदमाता, अंधेरी सब वे यासह अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. हिंदमाताच्या प्रकल्पाला कोरोनामुळे उशीर झाला. मात्र आम्ही कारणं देणार नाही असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

Water Logging मुळे अंधेरी सब वे बंद, मुंबई ठिकठिकाणी पावसाच्या सरी

मुंबईसह उपनगरांना पावसाने झोडपून काढलं आहे. मुंबईतील परिस्थितीचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी आढावा घेतला. दहीसर, मिलन सब वे, हिंदमाता या ठिकाणी कायम पाणी साठतं. आत्ताही साठलं आहे मात्र ते साठून राहाणार नाही त्याचा निचरा होईल. पाणी भरणारच नाही किंवा तुंबणारच नाही असा दावा कधीच केला नव्हता असंही महापौर म्हणाल्या.

हे वाचलं का?

पूर्वी पावसामुळे चार- पाच दिवस मुंबई ठप्प व्हायची पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आम्ही मुंबईतल्या सर्व भागांवर लक्ष ठेवून आहोत. ज्या ठिकाणी निष्काळजीपणा दिसेल तिथे त्वरीत कारवाई करत आहोत. गेल्या वर्षीपासून मनुष्यबळ विस्कळीत झालं आहे. मात्र हे कारण आम्ही देणार नाही. मुंबईत चार तासांहून अधिक काळ पाणी साचणार नाही याची आम्ही आमच्या परिने पूर्ण काळजी घेऊ असंही किशोरी ताईंनी म्हटलं आहे.

मागील काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत आणि शेजारील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरिपीट उडवली. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणंही अवघड झाले आहे. तर पहिल्या पावसाने लोकल सेवेलाही ब्रेक लावला. रेल्वे रुळावर पाणी आल्याने मध्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

रायगड जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा धोका, जिल्हाधिकाऱ्यांकडून सतर्कतेचे आदेश

ADVERTISEMENT

मुंबईच नाही पाणी तर पुण्यातही साठलं आहे. याबद्दल कुणालाही दोष न देता चार तासांच्या वर पाणी थांबत नाही त्याचा निचरा होतो आहे असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. ज्या ठिकाणी निष्काळजीपणा दिसेल तिथे आम्ही कारवाई करू असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षीपासून मॅन पॉवर विस्कळीत झाली आहे. जिथे शंभर लोक काम करत होते तिथे चाळीस लोकच काम करत आहेत. मात्र मुंबईतले रस्ते पाण्याखाली जाणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत असंही महापौरांनी म्हटलं आहे.

विरोधकांना जे काही आरोप करायचे आहेत ते करू दे आम्हाला त्यांच्या प्रशस्ती पत्रकाची गरज नाही. मुंबई महापालिका चांगलं काम करते आहे, आम्हाला काम करणं माहित आहे आम्हाला विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT