या ‘भेटी’मागे दडलंय काय…? शरद पवार-फडणवीस भेटीमागचे साडेतीन अर्थ!
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘सिल्व्हर ओक’ इथे भेट झाली. पण भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलू शकतात का? अशीही चर्चाही सुरु झाली आहे. खरं तर आपल्या महाराष्ट्रात अशी राजकीय परंपरा राहिली आहे की, वैर हे राजकीय असावं […]
ADVERTISEMENT
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘सिल्व्हर ओक’ इथे भेट झाली. पण भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलू शकतात का? अशीही चर्चाही सुरु झाली आहे. खरं तर आपल्या महाराष्ट्रात अशी राजकीय परंपरा राहिली आहे की, वैर हे राजकीय असावं वैयक्तिक नसावं. याच हेतूने देवेंद्र फडणवीस यांनी आज शरद पवारांची भेट घेतलेली असू शकते. पण या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चा सुरु झाली आहे. आता याच भेटीमागचे साडेतीन अर्थ आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
ADVERTISEMENT
साधारण दोन वर्षापूर्वी शरद पवारांबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नेमका काय दृष्टीकोन होता हे आपण पाहूयात आणि त्यानंतर या भेटीचे साडेतीन अर्थ काय आहेत हे आपण समजून घेऊयात:
अमित शाह आणि शरद पवार यांची कथित भेट आणि काही अनुत्तरीत प्रश्न
हे वाचलं का?
‘मी शरद पवार का बनू… मी तर देवेंद्र फडणवीस बनेन.. माझं स्वत:चं असं राजकारण आहे. मला त्यांच्या राजकारणाची आवश्यकता नाहीए. हे पाहा… शरद पवार यांच्या राजकारणाचा ‘एरा’ संपलेला आहे. आपण ही गोष्ट समजून घ्या. ज्या पद्धतीचं राजकारण ते करत होते… तोडण्या-फोडण्याचं, मुरगळण्याचं ते आता संपलेलं आहे. हे राजकारण आता चालणारं नाही. पीढी बदलेल्या आहेत. लोकांना आता ते राजकारण आवडत नाही. लोकं आता आमच्यासोबत का आहेत? कारण नव्या पिढीला असं वाटतं की, आम्ही त्यांच्या प्रकारचं राजकारण करतो.’
देवेंद्र फडणवीस
2019 च्या विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या काही काळ आधी देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं होतं. आता आपण जाणून घेऊयात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागचे साडेतीन अर्थ…
ADVERTISEMENT
खरं तर देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांचे संबंध नेहमीच ताणलेले आहेत. खरं तर पवारांचे सर्वच पक्षांमध्ये चांगले संबंध आहेत आणि भाजपचा विचार केला तर 1978 साली जनसंघातील नेत्यांना सोबत घेऊन पवारांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली होती. तेव्हापासून जनसंघातील अनके लोकांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध होते. पण देवेंद्र फडणवीस मागील काळात राष्ट्रवादी काँग्रेसवर अत्यंत तिखट शब्दात हल्ले केले होते. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादीतीली अनेक दिग्गज नेते फोडून त्यांच्या हाती भाजपचा झेंडा देखील त्यांनी दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादी संपते की काय? असं चित्र निर्माण केलं गेलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर पवार-फडणवीस यांच्या आजच्या भेट याला अनेक कंगोरे आहेत. जाणून घेऊयात याच भेटीमागचे साडेतीन अर्थ.
ADVERTISEMENT
पवार-फडणवीस भेटीचा पहिला अर्थ:
या भेटीचा पहिला अर्थ असा काढता येऊ शकतो की, देवेंद्र फडणवीस हे सर्वसमावेशक राजकारण करता येईल का याची चाचपणी करत आहेत. खरं तर फडणवीस इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये फडणवीस म्हणाले होते की, शरद पवार हे बुद्धीबळ खेळतात. याला पुढे कर, त्याला मागे कर… याची खाट टाक.. पण मी तसं राजकारण करत नाही. पण आता तेच फडणवीस एखादा विशिष्ट उद्देश डोळ्यापुढे ठेऊन बुद्धीबळाच्या तिरक्या चालीचा संदर्भ देऊन आज ते त्यांना भेटायला गेले. खरं तर देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच शरद पवार यांच्या घरी जाऊन भेटले आहेत.
तब्येतीची चौकशी करणं हा राजकीय शिष्टाचाराचा भाग असू शकतो. पण जेव्हा दोन बडे नेते अशा पद्धतीने अचानक भेटतात तेव्हा त्याला फक्त सदिच्छा भेट म्हणणं योग्य ठरणार नाही. त्यामुळेच फडणवीसांवर सर्वसमावेशक राजकारण करण्याचा प्रयत्न दिसतो आहे. दरम्यान, भाजपची सत्ता गेल्यापासून भाजपमधून फडणवीसांवर बरेच हल्ले होत आहेत. फडणवीस हे एककल्ली, मनमानी कामकाज करतात. असे त्यांच्यावर सातत्याने आरोप करतात. त्यामुळे आता मी सर्व हेवेदावे विसरुन पवारांना भेटायला जाऊ शकतो म्हणजे माझं मन किती मोठं आहे हे दाखविण्याचा देखील देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न असू शकतो. असा मेसेज त्यांनी पक्षाला आणि इतर नेत्यांनाही देण्याचा प्रयत्न केला आहे. हा या भेटीचा पहिला अर्थ निघू शकतो.
पवार-फडणवीस भेटीचा दुसरा अर्थ:
संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर शरद पवार यांनी असं म्हटलं होतं की, आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करु लागले आहेत. खरं तर पवारांचं हे वक्तव्य फडणवीसांना फारच बोचलं होतं. तेव्हापासून फडणवीसांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पवारांविरोधात सातत्याने गंभीर आणि बोचरी टीका केली होती. पण आता बदलेली परिस्थिती लक्षात घेता या पार्श्वभूमीवर हा वैयक्तिक दुरावा कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. हा या भेटीचा दुसरा अर्थ होऊ शकतो.
2019 चे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरकार स्थापनेवरुन चर्चा झाली होती. मात्र, यावेळी फक्त देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नकोत या एका अटीवरुन ही बोलणी फिस्कटली होती. त्यामुळे फडणवीसांच्या मनात वैयक्तिक दुरावा असणारच कारण तुमच्यामुळे मी पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकलो नाही किंवा 72 तासांचं सरकार पडलं.. हा सगळा राग या वैयक्तिक दुराव्याचं आणखी एक कारण असू शकतं.
महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही-शरद पवार
दरम्यान, शरद पवार आणि प्रफुल पटेल हे साधारण दोन महिन्यांपूर्वी गुजरातला जाऊन अमित शाह यांना भेटले असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. यानंतर राष्ट्रवादीकडून असं स्पष्ट करण्यात आलं होतं. अशी कोणतीही भेट झालेली नाही. मात्र, अमित शाह यांनी सरसकट नकार दिलेला नव्हता.
साधारण गेल्या दीड वर्षात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकदाही अशी एकांतात भेट झाली नव्हती. पण तीच भेट झाली आहे. त्यामुळे जो आलेला दुरावा आहे तो कमी करण्यासाठी फडणवीसांना एक पाऊल पुढे टाकलेलं असू शकतं. जेव्हा दोन मोठे नेते भेटतात तेव्हा काही तरी योजनांबाबत नक्कीच चर्चा होते. हे आपल्याला लागलीच समजणार नाही. मात्र या भेटीचे पडसाद किंवा परिणाम हे पुढील काही दिवसात उमटलेले पाहायला मिळू शकतात. त्यामुळे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावा कमी करण्यासाठी ही भेट झालेली असू शकते असा दुसरा अर्थ निघू शकतो.
पवार-फडणवीस भेटीचा तिसरा अर्थ:
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मोठे-मोठे मराठा समाजाचे मोर्चे निघाले होते. त्यावेळी फडणवीसांवर दबाव आणण्यासाठी हे मोर्चे काढले जात आहेत का? अशी चर्चा सुरु झाली होती. यानंतर फडणवीस हे सत्तेत असताना यथावकाश मराठा आरक्षणाचा कायदा संमत करुन राज्यात ते लागू करण्यात आलं होतं. पण काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द करत असल्याचा निर्णय दिला होता.
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर या विषयावरुन महाराष्ट्र ढवळून निघत आहे. पण आजच्या भेटीतून फडणवीस यांनी असा एक मेसेज देण्याचा नक्कीच प्रयत्न केला असणार की, या विषयावर आम्ही दोघं एकत्र आहोत. आम्ही नक्कीच याबाबत विचार करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत. हा तिसरा अर्थ या भेटीतून काढला जाऊ शकतो.
ठाकरे सरकार आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यात विस्तव का जात नाही?
पवार-फडणवीस भेटीचा अर्धा (साडेतीन) अर्थ:
आजच्या भेटीतून शरद पवार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काही मेसेज द्यायचा आहे का? अशी चर्चा रंगू लागली आहे. खरं तर 2019 च्या निकालानंतर राष्ट्रवादीसोबत भाजपची बरीच चर्चा झाली होती. कोणाला कुठली खाती द्यायची हे देखील ठरलं होतं असं स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. पण असं असताना फक्त मुख्यमंत्री कोण असावं यावरुन सगळी गणितं बिघडली. पण या सगळ्यानंतर आजची ही भेट नक्कीच साधी-सरळ नव्हती. त्यामुळे आजची ही भेट उद्धव ठाकरे यांची काळजी वाढविणारी ठरु शकते. त्यामुळे आजची भेट ही उद्धव ठाकरेंवर प्रेशर वाढविण्यासाठी देखील असू शकते असा अर्धा (साडेतीन) अर्थ निघू शकतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT