Mumbai Mayor किशोरी पेडणेकरांचं आक्षेपार्ह ट्विट प्रकरण नेमकं काय आहे? काय दिलं स्पष्टीकरण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या कालपासून ट्विटरवर चांगल्याच चर्चेत आहेत. याचं कारण आहे त्यांनी केलेलं एक ट्विट आणि त्यानंतर त्यांनी ते डिलिट करणं. ते ट्विट आक्षेपार्ह भाषेत होतं त्यामुळे त्यांना ते डिलिट करावं लागलं. यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना ट्विटरवर प्रचंड ट्रोलिंगही सहन करावं लागलं. एवढंच नाही तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी महापौरांना आपला फोन आपली जबाबदारी असं म्हणत टोलाही लगावला. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि किशोरी पेडणकारांना ट्विट डिलिट का करावं लागलं जाणून घेऊ.

ADVERTISEMENT

नेमकं काय घडलं?

हे वाचलं का?

एका मराठी वृत्तवाहिनीने किशोरी पेडणेकर यांची मुलाखत ट्विटरवर पोस्ट केली होती. या मुलाखतीत 1 कोटी लोकांना लस देण्यासंबंधी मुंबई महापालिकेने जे ग्लोबल टेंडर काढलं आहे त्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. ग्लोबल टेंडरला 9 कंपन्यांनी प्रतिसाद दिल्याचं महापौर सांगत होता. त्यावेळी Mithi River या नावाने असलेल्या @Swapnil80336122 या ट्विटर हँडलवरून एक प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न होता की ‘काँट्रॅक्ट कुणाला दिलं?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर किशोरी पेडणेकर यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून उत्तर देण्यात आलं ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर देण्यात आलं. झालं या उत्तरावरून या मिठी रिव्हर ट्विटर हँडलचे आणि त्याला महापौरांनी दिलेल्या उत्तरांचे स्क्रीन शॉट ट्विटरवर फिरू लागले आणि मुंबईच्या महापौर ट्रोल होऊ लागल्या. महापौर असलेल्या व्यक्तीला अशी भाषा बोलणं शोभतं का? मुंबईच्या महापौरांच्या तोंडी अशी भाषा का? महापौर नेमक्या कोणत्या गुर्मीत आहेत? हे आणि इतर अनेक प्रश्न ट्विटर आणि इतर सोशल मीडियावरून महापौरांना विचारण्यात आले.

दरम्यान महापौरांनी हे उत्तर त्यांच्या फोनवरून डिलिट केलं. त्यानंतर तर नेटकऱ्यांनी आणखी स्क्रिनशॉट्स व्हायरल करून त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली. हे ट्रोलिंग इतकं वाढलं की महापौर किशोरी पेडणेकर यांना याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं. ते ट्विट मी केलंच नव्हतं असंही त्यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय स्पष्टीकरण दिलं?

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या त्यांच्या या आक्षेपार्ह ट्विटमुळे वादात अडकल्या होत्या. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भातलं स्पष्टीकरण दिलं आहे. महापौर म्हणाल्या, मी बीकेसीमध्ये एका कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी माझ्यासोबत शाखाप्रमुख आणि दोन शिवसेना कार्यकर्ते होते. कार्यक्रम असताना मी माझा मोबाईल माझ्याकडे ठेवत नाही. तसंच माझ्या मोबाईलला लॉकही नाही. मोबाईल पाहात असताना एका शिवसैनिकाने ते उत्तर दिलं होतं. त्या ट्विटला माझ्या अकाऊंटवरून गेलेला रिप्लाय पाहिल्यानंतर मला ही मोठी चूक झाल्याचं लक्षात आलं. आपल्याशी कुणी कितीही वाईट वागलं तरीही आपण तसं वागू नये या मताची मी आहे. मी कधीही गैरवर्तन करत नाही. त्यामुळे ते ट्विट मी तातडीने डिलिट केलं. तसंच ज्या कार्यकर्त्याने तो रिप्लाय दिला होता त्याला मी पुन्हा माझ्याकडे यायचं नाही असं सांगितलं असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या सगळ्या प्रकरणावरून मला धडा मिळाला कुणीही कितीही जवळचं असेल तरीही त्याच्या हाती मोबाईल देऊ नये. आज ट्विटला रिप्लाय केला उद्या काहीही होऊ शकतं अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.

किशोरी पेडणेकर यांनी ट्विट प्रकरणी स्पष्टीकरण दिल्यानंतरही त्या ट्रोल होत आहेत. याचं कारण आहे त्यांच्या विरोधात ट्विटरवर वापरलं जाणारं वाक्य. माझे कुटुंब माझी जबाबदारी या सरकारच्या घोषणेवरून उपरोधिकपणे हे वाक्य तयार कऱण्यात आलं आहे. माझा फोन माझी जबाबदारी असं म्हणत नेटकरी महापौरांना ट्रोल करत आहेत.

मनसे नेते संदीप देशपांडे यांचा टोला

शिवसेनेच्या महापौरांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माझा फोन माझी जबाबदारी असं म्हणत या सगळ्या प्रकरणाची खिल्ली उडवली. आता नेटकरी त्यांचीच रि ओढत किशोरी पेडणेकर यांना ट्रोल करत आहेत. एवढंच नाही मिठी नदी या ट्विटर हँडलला त्यांनी हे उत्तर दिलं होतं त्या युजरनेही माझा फोन माझी जबाबदारी असं म्हणत किशोरी पेडणेकरांची खिल्ली उडवली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT