Vehicle Registration Policy : वाहनांच्या नंबर प्लेटसाठीची BH सीरीज काय आहे? वन नेशन वन नंबर कसं असणार आहे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मोदी सरकारने कार-बाईकच्या नंबर प्लेटसंदर्भात एक नवी पॉलिसी आणली आहे, वेहिकल रजिस्ट्रेशन पॉलिसी. मोदी सरकारची ही वन नेशन वन नंबर प्लेट पॉलिसी काय आहे, समजून घ्या.

ADVERTISEMENT

देशभरात अनेक राज्य सरकार-केंद्र सरकारचे अधिकारी, संरक्षण दलाचे अधिकारी, खाजगी कंपन्यांचे कर्मचाऱी असे असतात ज्यांनी ट्रान्सफर होत असते. अशांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना आपल्या कार किंवा बाईक-स्कूटीचं नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागतं. आधी याची प्रक्रिया किचकट होती आणि वारंवार रजिस्ट्रेशन करणंही डोकेदुखी होती.

मोटर वेहिकल अक्ट 1988 च्या सेक्शन 47 नुसार एखाद्या राज्यातील रजिस्टर कार तुम्ही दुसऱ्या राज्यात एका वर्षापर्यंत चालवू शकता. या एका वर्षात तुम्हाला तुमची कार किंवा बाईक दुसऱ्या राज्यात रजिस्टर करून घ्यावी लागते.

हे वाचलं का?

Tokyo Olympic 2020 : हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ का नाही? का भारताला एकही राष्ट्रीय खेळ नाही? समजून घ्या

तुम्ही महाराष्ट्रातून दिल्लीला शिफ्ट झालात तर तिथे गेल्यावर पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागतं. RTO कडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC आणावी लागते. प्रत्येक राज्याची वेगवेगळी प्रक्रिया असते त्यामुळे अनेकदा RTO चे हेलपाटे घालण्यातच वेळ जातो…त्यामुळे अनेक जण रजिस्ट्रेशन करायलाही कचरतात आणि आपली वाहनं दुसऱ्या राज्यात वापरतही नाहीत.

ADVERTISEMENT

पण आता नव्या वेहिकल रजिस्ट्रेशन पॉलिसीमुळे ही डोकेदुखी मिटेल.

ADVERTISEMENT

  • काय आहे नवी वेहिकल रजिस्ट्रेशन पॉलिसी?

देशात कार-बाईकसाठी एक BH सिरीज सुरू करण्यात येणार आहे. म्हणजेच महाराष्ट्राचं जसं MH आहे आणि वेगवेगळ्या राज्यांचे वेगळे कोड आहेत, त्यापेक्षा BH म्हणजेच भारत हा एकच कोड वापरून ती गाडी देशभरात कुठल्याही राज्यात वापरता येऊ शकते.

या पॉलिसीमुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे RTO चे हेलपाटे घालण्याची कटकट मिटणार आहे. कारण ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन करता येणार आहे.

Raj Kundra Porn Case : पॉर्न पाहणं भारतात गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो? समजून घ्या

  • या पॉलिसीमुळे नवी नंबर प्लेट कशी दिसेल पाहा.

    महाराष्ट्रात कारचा नंबर हा MH ने सुरू होतो…गुजरातमध्ये GJ, राजस्थानमध्ये RJ, दिल्लीमध्ये DL ने सुरू होतो…राज्यांच्या या कोडनंतर RTOचा एक कोड वापरला जातो. जसं मुंबईचा 01, पुण्याचा 12, नवी मुंबईचा 43 आणि मग पुढे AA-ZZ यातील 2 अक्षरं दिली जातात आणि मग 0000 ते 9999 या दरम्यानचा नंबर दिला जातो….अशाप्रकारे नंबर प्लेट तयार होते.

पण आता ज्या वर्षात तुम्ही कारचं रजिस्ट्रेशन कराल ते वर्ष पहिले असेल, यावर्षी रजिस्टर झाली तर 21 आकडा पहिले येईल, मग त्यानंतर BH हा कोड येईल, त्यानंतर 0001 ते 9999 दरम्यानचा कुठलाही एक आकडा आणि नंबर AA-ZZ दरम्यानची अक्षरं अशाप्रकारची 21 BH 0123 AB अशी नंबर प्लेट देण्यात येईल.

समजून घ्या : एक देश एक रेशन कार्ड योजना आहे तरी काय?

कोणाला मिळणार याचा लाभ?

1. केंद्र-राज्य सरकारचे कर्मचारी-अधिकारी

2. PSU चे कर्मचारी-अधिकारी

3. संरक्षण दलाचे अधिकारी

4. खाजगी कंपनीचे कर्मचारी

खाजगी कंपन्या ज्यांच्या शाखा किंवा ऑफीस 4 पेक्षा जास्त राज्यांमध्ये असेल, असे कर्मचारीही या नव्या वेहिकल रजिस्ट्रेशन पॉलिसीचा लाभ घेऊ शकतील.

जर नव्यानेच तुम्ही वाहन खरेदी करत असाल, तर तेव्हाच तुम्हाला BH सिरीजची नंबर प्लेट घेण्याचा पर्याय देण्यात येईल, जर तुम्ही सरकारने ठरवलेल्या कॅटेगरीतले असाल तर.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT